सुर्योदय सहकारी पतसंस्थेचे उद्घाटन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2018 03:59 PM2018-12-26T15:59:29+5:302018-12-26T15:59:49+5:30
नायगाव - नायगाव येथे सुर्योदय ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेचे उद्घाटन आमदार राजाभाऊ वाजे यांच्या हस्ते झाले.
नायगाव - नायगाव येथे सुर्योदय ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेचे उद्घाटन आमदार राजाभाऊ वाजे यांच्या हस्ते झाले. राज्यासह तालुक्यात सहकारक्षेत्राची प्रतिकूल परिस्थती असतांनाही नायगाव खो-यातील गरजू लोकांची आर्थिक घडी बसविण्यासाठी तरूणांनी एकत्र येऊन पतसंस्था स्थापन करणे कौतुकास्पद असल्याचे प्रतिपादन यावेळी आमदार राजाभाऊ वाजे यांनी केले. संस्था स्थापनेपेक्षा ती सुरळीत सुरू ठेवणे कठीण काम आहे. संस्थेत काम करत असतांना पदाधिका-यांनी राजकारणाचे जोडे व शिफारशी बाजुला ठेवून आर्थिक व्यवहार केले तर सहकार क्षेत्र टिकविणे सोपे असल्याचे माजी आमदार माणिकराव कोकाटे यांनी आपल्या भाषणात सांगितले. सुर्योदय ग्रामीण पतसंस्था नायगाव खो-यासह तालुक्यातील शेतकº्यांसाठी मैलाचा दगड ठरणार असल्याचा विश्वास माजीमंत्री तुकाराम दिघोळे यांनी आपल्या भाषाणातून व्यक्त केला. यावेळी उपाध्यक्ष रामनाथ बोडके,चंद्रकांत बोडके,राजेंद्र काकड,अजय हुळहुळे,नितीन लोहकरे,पंकज जेजुरकर,सुनंदा आव्हाड,सुनिता पाबळे आदी संचालकांसह सभासद व ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते. संस्थेचे अध्यक्ष मोहन कातकाडे यांनी प्रास्तविक तर उपाध्यक्ष रामनाथ बोडके यांनी आभार मानले. * चौकट - गेल्या चार वर्षात आमदार राजाभाऊ वाजे व माजी आमदार माणिकराव कोकाटे हे कोणत्याही कार्यक्र माच्या व्यासपीठावर एकत्र आले नाही.मात्र सुर्योदय पतसंस्थेच्या शुभारंभाचे दोघांनाही आमंत्रण देण्यात आले होते.त्यामुळे वाजे व कोकाटे एका व्यासपीठावर येणार का ? याची उत्सुकता ग्रामस्थांना लागली होती.मात्र हे दोघे प्रथमच एकाच व्यासपीठावर आले . यावेळी दोघांनी ही आपल्या भाषणात एक-मेकांचा आदरपुर्वक नामोल्लेखही केल्याने सभास्थळी चर्चेचा विषय बनला.त्याच बरोबर आमदारकी व खासदारकीची तर ही नांदी नाही ना अशी चर्चा यावेळी उपस्थितांमध्ये रंगली नाही तरच नवल.