शेतकी संघाच्या तूर खरेदी केंद्राचे उद्घाटन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2018 12:44 AM2018-02-17T00:44:48+5:302018-02-17T00:45:03+5:30
शेतकरी सहकारी संघातर्फे तूर खरेदी केंद्र सुरू करण्यात आले आहे. या केंद्राचे उद्घाटन जिल्हा मार्केटिंग अधिकाºयांच्या हस्ते नुकतेच करण्यात आले आहे.
मालेगाव : शेतकरी सहकारी संघातर्फे तूर खरेदी केंद्र सुरू करण्यात आले आहे. या केंद्राचे उद्घाटन जिल्हा मार्केटिंग अधिकाºयांच्या हस्ते नुकतेच करण्यात आले आहे. केंद्र शासनाच्या आधारभूत किंमत योजनेंतर्गत नाफेडच्या वतीने तूर खरेदी केली जात आहे. २०१७-१८ वर्षाच्या खरीप हंगामातील तूर खरेदीसाठी महाराष्टÑ स्टेट को. आॅपरेटिव्ह फेडरेशनने सब एजंट म्हणून शेतकरी सहकारी संघ लि. संस्थेची नेमणूक केली आहे. यानुसार येथील मार्केट कमिटी आवारात या केंद्राचे उद्घाटन झाले आहे. शेतकºयांनी स्वच्छ व कोरडी तूर केंद्रावर विक्रीसाठी आणावी, असे आवाहन सभापती मनीषा हिरे, उपसभापती भीमेश्वर महाजन यांनी केले आहे. कार्यक्रमास संचालक समाधान हिरे, विठोबा छरंग, नंदलाल निकम, नाना देवरे, भूषण गोलाईत, जीवन गरुड, दादाभाऊ अहिरे, प्रवीण हिरे, केशव हिरे, केंद्रप्रमुख तुषार बाविस्कर, संघाचे व्यवस्थापक धर्मा अहिरे आदी उपस्थित होते.