रामदास स्वामी नगरला लसीकरण केंद्राचे उद्घाटन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2021 04:20 AM2021-08-25T04:20:30+5:302021-08-25T04:20:30+5:30
नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न नाशिक : स्नेहबंधन पार्क परिसरातील भूमिगत गटार तुंबल्यामुळे गटारीतील साडपाणी रस्त्यावर वाहत आहे. यामुळे ...
नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न
नाशिक : स्नेहबंधन पार्क परिसरातील भूमिगत गटार तुंबल्यामुळे गटारीतील साडपाणी रस्त्यावर वाहत आहे. यामुळे या परिसरात दुर्गंधी पसरली असून नागरिकांना त्याचा त्रास सहन करावा लागत आहे. यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्नही निर्माण झाला आहे. याबाबत नागरिकांनी तक्रार करुनही अद्याप त्याची दखल घेतली गेली नसल्याने नाराजी व्यक्त केली आहे. याबाबत त्वरित योग्य ती कार्यवाही करावी अशी मागणी करण्यात येत आहे.
पाईपलाईन फुटल्याने हजारो लिटर पाणी वाया
नाशिक : शहरातील अशोक स्तंभ ते रामवाडी पुलादरम्यान स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत रस्त्याचे काम करण्यात आले आहे. हे काम करताना पाईपलाईन फुटलेली असल्याने या ठिकाणी दररोज हजारो लिटर पाणी वाया जात आहे. दररोज पाणी रस्त्यावर वाहात असते. यामुळे नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे. या पाईपलाईनची त्वरित दुरुस्ती करावी अशी मागणी परिसरातील नागरीकांनी केली आहे.
वाहतूक बेटात साचले पाणी
नाशिक : रविवार कारंजा परिसरात वाहतूक बेटाची दुरवस्था झाली आहे. मागील सप्ताहात झालेल्या पावसामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी साचून पाण्याचे डबके तयार झाले आहे. या ठिकाणी डासांची उत्पत्ती होत असल्याने परिसरातील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. डेंग्यू, चिकन गुनियाची साथ सुरू असताना डास उत्पत्तीची ठिकाणे नष्ट करणे आवश्यक असल्याने महापालिकेने याबाबत त्वरित कायवाही करावी, अशी मागणी करण्यात येत आहे.