मुल्हेर किल्ल्यावर विविध कामांचे उद् घान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2020 06:55 PM2020-12-24T18:55:31+5:302020-12-24T18:56:10+5:30
जोरण : बागलाण तालुक्यातील ऐतिहासिक मुल्हेर किल्ला येथील जागृत तीर्थक्षेत्र शिव मंदीर असुन येथे वास्तव्यास असलेले गुरुवर्य संत संतसुदामदास ...
जोरण : बागलाण तालुक्यातील ऐतिहासिक मुल्हेर किल्ला येथील जागृत तीर्थक्षेत्र शिव मंदीर असुन येथे वास्तव्यास असलेले गुरुवर्य संत संतसुदामदास महाराज यांची जंगलात राहून ध्यान तपस्या महान आहेक त्यामुळे येथील क्षेत्र विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य विधानसभा उपाध्यक्ष आमदार नरहरी झिरवाळ यांनी केले.
मुल्हेर येथील किल्ल्यावर विश्वशांती करिता उत्तरायण उत्सव अखिल भारतीय श्री. पंच दिगंबर अनी आखाड्याचे उपाध्यक्ष श्री. रामकिशोरदासजी शास्त्री यांचे शिष्य संतसुदामा दास महाराज यांना भारतातील शेकडो साधुसंत यांच्या उपस्थितीत श्री. श्री. १०८श्री. महत पदी गादीवर विराजमान कार्यक्रम प्रसंगी नामदार आमदार झिरवाळ प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.
ह.भ.प. विश्वनाथ महाराज यांनी कीर्तनाचा कार्यक्रम झाल्यानंतर सहकार अधिकारी वसंत गवळी, अरुणकुमार भामरे यांनी प्रास्ताविक करून योगेश शास्त्री यांनी मंत्रपठण करून धार्मिक पूजन केले. यावेळी साक्री येथील आमदार सौ. मंजुळा गावित, मविप्र संस्थेच्या सरचिटणीस श्रीमती. नीलिमाताई पवार, अध्यक्ष डॉ. तुषार शेवाळे ,बाजार समिती सभापती इंजि. संजय भामरे, संचालक कृष्णा भामरे, आबा बच्छाव यांनी किल्ला तीर्थक्षेत्र विकास कामाकरता आपले मत व्यक्त करुन श्री. श्री. १०८ श्री. महंत संतसुदामादास महाराज यांचा तिलक पूजन करून प्रभू श्रीराम ,भगवान सोमेश्वर आदी नावांचा जयघोष केला.
द्वारकाधीश साखर कारखान्याचे अध्यक्ष शंकरराव सावंत, उपसभापती राघो अहिरे, संचालक डॉ. प्रशांत देवरे ,डॉ. विश्राम निकम, अशोक पवार, नाशिक येथील नगरसेवक दिनकर पाटील, जि. प. सदस्य यतीन पगार, के.पी.जाधव, साधना गवळी, रेखा पवार, सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीकृष्ण पारधी, रामकृष्ण अहिरे, बिंदू शेठ शर्मा , यशवंत पाटील , नानाजी जाधव , रोहिदास जाधव, किरण जाधव, सोमनाथ वालझाडे, कृष्णा महाले, राजू गांगुर्डे, अर्जुन भामरे, काळू धोंडगे, शरद शेवाळे, संजय निकम, रुपेश वालझाडे, गोकुळ परदेशी, पवन तिवारी, भास्कर अहिरे, डी.बी. आहिरे , दर्शन खैरनार ,विकास जाधव,यांच्यासह महाराष्ट्र गुजरात व इतर राज्यातील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.