सिन्नरला सेवादलाच्या पाणपोईचे उद्घाटन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 2, 2019 05:39 PM2019-04-02T17:39:23+5:302019-04-02T17:39:40+5:30
सिन्नर : अंगाची लाही करणाऱ्या कडक उन्हाळ्यात सर्व सामान्यांची तहान भागवण्यासाठी राष्टÑ सेवा दलाच्या वतीने सोमवार (दि.१) रोजी सिन्नर सार्वजनिक वाचनालयाच्या समोरील नगरपरिषदेच्या व्यापारी संकुलात शुभारंभ करण्यात आला.
सिन्नर : अंगाची लाही करणाऱ्या कडक उन्हाळ्यात सर्व सामान्यांची तहान भागवण्यासाठी राष्टÑ सेवा दलाच्या वतीने सोमवार (दि.१) रोजी सिन्नर सार्वजनिक वाचनालयाच्या समोरील नगरपरिषदेच्या व्यापारी संकुलात शुभारंभ करण्यात आला. सेवा दलाचे ज्येष्ठ सदस्य मोतीकाका खिंवसरा, पांडुरंग मुंढे यांच्या हस्ते पाणपोईचे उद्घाटन करण्यात आले.
सेवा दलाचे पहिले दलप्रमुख तथा ज्येष्ठ समाजवादी नेते एस. एम. जोशी यांच्या स्मृतीदिनानिमित्त सुरू करण्यात आलेली ही पाणपोई दररोज सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत सर्वांसाठी विनामुल्य खुली असणार आहे. राष्टÑपतीपदावर बिनविरोध पाठवण्याचा शब्द दिला जात असतानाही आपल्या तत्वाशी तडजोड न करता राष्टÑपतीपद नाकारणारे एस. एम. जोशी खऱ्या अर्थाने श्रद्धेय असल्याची भावना सेवानिवृत्त नायब तहसीलदार दत्ता वायचळे यांनी व्यक्त केली. व त्यांच्या स्मृतीदिनानिमित्त पाणपोई सुरू करण्यात आल्याबद्दल कौतुक केले. सेवा दलाचे शहराध्यक्ष अजय शिंदे यांना कॉ. गोविंद पानसरे यांनी लिहीलेली पुस्तीका देवून शिंदे यांचा सत्कार करण्यात आला.