कावनई येथे हिवाळी श्रमसंस्कार शिबीराचे उद्घाटन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2019 06:18 PM2019-12-23T18:18:31+5:302019-12-23T18:23:06+5:30
वैतरणानगर : येथील मविप्र समाजाचे कर्मवीर पुंजाबाबा गोवर्धने कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय इगतपुरी आणि नाशिक शिक्षण पसारक्र मंडळाचे कला व वाणिज्य महाविद्यालय इगतपुरी यांच्या संयुक्त विद्यमाने कावनई येथे हिवाळी श्रमसंस्कार शिबीराचे उद्घाटन पार पडले.
वैतरणानगर : येथील मविप्र समाजाचे कर्मवीर पुंजाबाबा गोवर्धने कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय इगतपुरी आणि नाशिक शिक्षण पसारक्र मंडळाचे कला व वाणिज्य महाविद्यालय इगतपुरी यांच्या संयुक्त विद्यमाने कावनई येथे हिवाळी श्रमसंस्कार शिबीराचे उद्घाटन पार पडले.
यावेळी कार्यक्र माचे अध्यक्ष मविप्र समाज संस्थेचे इगतपुरी तालुका संचालक भाऊसाहेब खातळे, तर प्रमुख पाहुणे म्हणून मविप्र समाज संस्थेचे सभापती माणिकराव बोरस्ते उपस्थित होते.
यावेळी प्राचार्य डॉ. पी. आर. भाबड, प्राचार्य डॉ. एन.जी. वामन, घोटीचे सरपंच मनोहर घोडे, कावनईच्या सरपंच श्रीमती संगिता पाटील, बोरस्ते, खातळे, निवृत्ती शिरसाठ, संतोष शिरसाठ, विकास शिरसाठ यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. या कार्यक्र माचे प्रास्ताविक प्रा. बी. सी. पाटील यांनी केले. कावनई ग्रामपंचायत, कामाक्षी माता देवस्थान समिती व सर्व ग्रामस्थांनी उत्साहात शिबीरासाठी आलेल्या स्वयंसेवकांचे स्वागत केले.
हिवाळी शिबीराच्या निमित्तशने घोटीचे पोलिस निरीक्षक जालिंदर पळे, राजाराम पाटील, गोपाळ पाटील, रामभाऊ पाटील, नंदू पाडेकर, राजाराम शिरसाठ, पांडुरंग शिरसाठ, हरिश्चंद्र पाडेकर, रोहिदास उगले, वनरक्षक सुनिल बोरसे, प्रभाकर कुयटे, नंदू कदम, आनंद बोºहाडे, प्रभाकर शिंदे, प्रदिप क्षीरसागर, रासेयो कार्यक्र म अधिकारी प्रा. श्रीमती एस. के. शेळके, प्रा. के. के. चौरिसया, उपप्राचार्य प्रा. देवीदास गिरी आदी उपस्थित होते. प्रा. आर. एम. आंबेकर यांनी सूत्रसंचालन तर प्रा. जी. एस. लायरे यांनी आभार मानले.