डासांचा प्रादुर्भाव वाढला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2021 04:12 AM2021-06-24T04:12:05+5:302021-06-24T04:12:05+5:30
उत्पादन खर्च वाढला नाशिक : गेल्या काही दिवसांपासून निर्माण झालेल्या ढगाळ वातावरणामुळे भाजीपाला पिकांवर परिणाम होत असल्याने शेतकऱ्यांना वेगवेगळ्या ...
उत्पादन खर्च वाढला
नाशिक : गेल्या काही दिवसांपासून निर्माण झालेल्या ढगाळ वातावरणामुळे भाजीपाला पिकांवर परिणाम होत असल्याने शेतकऱ्यांना वेगवेगळ्या औषधांची फवारणी करावी लागत आहे. यामुळे पिकांच्या उत्पादन खर्चात वाढ झाली आहे. पण त्या तुलनेत दर मिळत नसल्याची तक्रार होत आहे.
रस्त्यावर पार्किंगमुळे अडचण
नाशिक : शहरातील महात्मा गांधी रोडवर रस्त्यावर होणाऱ्या वाहन पार्किंगमुळे वाहतुकीस मोठ्या प्रमाणात अडथळा निर्माण होत आहे. याबाबत वाहतूक पोलिसांनी योग्य ती कार्यवाही करावी, अशी मागणी करण्यात येत आहे.
शेतकऱ्यांना आर्थिक भुर्दंड
नाशिक : पहिल्या पावसामुळे शेतांमध्ये मोठ्या प्रमाणात गवत उगवले असल्याने पेरणीपूर्वी ते काढण्यासाठी शेतकऱ्यांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. पेरणीपूर्वी केलेली मशागत यामुळे वाया गेली असल्याची भावना व्यक्त होत आहे.
कॅनॉल रोडवर अंधार
नाशिक : उपनगर नाका ते जेल टाकी या कॅनॉल रोडवर अनेक ठिकाणी पथदिवे बंद असल्याने या परिसरात अंधाराचे साम्राज्य पसरलेले असते. या रस्त्याच्या बाजूलाच झोपडपट्टी असल्याने रस्त्यावर लहान मुलांची वर्दळ असते. यामुळे वाहनचालकांना वाहन चालविताना कसरत करावी लागते. पथदिवे सुरू करण्याची मागणी करण्यात येत आहे.