पंचवटीत डासांचा प्रादुर्भाव वाढला
By Admin | Published: March 20, 2017 11:11 PM2017-03-20T23:11:27+5:302017-03-20T23:11:58+5:30
पंचवटी : परिसरात गेल्या काही दिवसांपासून डासांचा प्रादुर्भाव वाढल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत.
पंचवटी : परिसरात गेल्या काही दिवसांपासून डासांचा प्रादुर्भाव वाढल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. डासांचा प्रादुर्भाव वाढल्याने महापालिकेच्या संबंधित विभागाकडून परिसरात औषध फवारणी करण्यात यावी, अशी मागणी येथील नागरिकांनी केली होती.
मनपाच्या संबंधित विभागाकडून धूर फवारणी केली जात असली तरी त्याचा कोणताही परिणाम डासांवर होत नसल्याने डासांचा प्रादुर्भाव वाढतच चालला आहे. डासांचा प्रादुर्भाव वाढल्याने शहरात पुन्हा डेंग्यू, मलेरिया यांसारखे रोग पसरण्याची शक्यता असल्याने सध्या परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरलेले आहे. डासांचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी महापालिका प्रशासनाकडून लाखो रुपये खर्च केले जात असले तरी त्याचा विशेष कोणताही परिणाम होत नसल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. सध्या उन्हाळा सुरू झाला असल्याने नागरिकांना उकाड्याचा सामना करावा लागत आहे. दिवसाच्या उकाडा तर रात्रीच्या वेळी डासांचा प्रादुर्भाव यामुळे सध्या तरी नागरिक त्रस्त झाले आहेत. (वार्ताहर)