इगतपुरीत गतिमंद युवतीवर अतिप्रसंग; गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 10, 2019 12:41 AM2019-08-10T00:41:19+5:302019-08-10T00:42:20+5:30
बारा बंगला परिसरात रेल्वेच्या मोडकळीस आलेल्या बंगल्यात नेऊन एका गतिमंद युवतीवर एका तरुणाने अतिप्रसंग केल्याची घटना बुधवारी घडली. संशयित आरोपी फरार असून, इगतपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नाशिक : शहरातील बारा बंगला परिसरात रेल्वेच्या मोडकळीस आलेल्या बंगल्यात नेऊन एका गतिमंद युवतीवर एका तरुणाने अतिप्रसंग केल्याची घटना बुधवारी घडली. संशयित आरोपी फरार असून, इगतपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
इगतपुरी शहरातील संशयित आरोपी सूरज सरोदे (३०) रा. शिवाजी चौक याने एका १९ वर्षीय गतिमंद मुलीला फूस लावून दुपारच्या सुमारास तुला रिक्षाने घरी सोडतो असे सांगत बारा बंगला परिसरातील मोडकळीस, खंडर अवस्थेत असलेल्या रेल्वेच्या क्वार्टरमध्ये नेत अतिप्रसंग केला. दरम्यान, गतिमंद मुलीने ही घटना कुटुंबीयांना सांगितल्यावर त्यांनी इगतपुरी पोलीस ठाण्यात धाव घेत फिर्याद दिली आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक अशोक रत्नपारखी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक नीलेश सोनवणे करीत आहे. बारा बंगला परिसरात ब्रिटिशांनी उभारलेली रेल्वेची मोठी वसाहत आहे. या ठिकाणी असलेल्या अनेक बंगल्यांची मोठ्या प्रमाणात पडझड झाली आहे.