नाशिकरोड भागात घरफोडी, हाणामारीच्या घटना 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2020 06:24 PM2020-06-09T18:24:54+5:302020-06-09T18:31:09+5:30

नाशिकरोड भागात घरफोडी व हाणामारीच्या घटना घडल्याचे समोर आहे आहे.   देवळालीगाव मालधक्का रोड गुलाबवाडी येथे बंद घराच्या दरवाजाचे कडी कुलूप तोडून अज्ञात चोरट्याने सुमारे सव्वा दोन लाख रुपयांचा ऐवज चोरून नेला. तर   जेलरोड नारायण बापू चौकात कंपनीच्या कामगारांना सोडणाऱ्या बस चालकास मारहाण झाल्याची घटना घडली आहे. 

Incidents of burglary and violence in Nashik Road area | नाशिकरोड भागात घरफोडी, हाणामारीच्या घटना 

नाशिकरोड भागात घरफोडी, हाणामारीच्या घटना 

googlenewsNext
ठळक मुद्देनाशिकरोड भागात गुन्हेगारीत वाढदेवळाली परिसरात कुलूप तोडून घरफोडी जेलरोड परिसरात वाहनचालकास मारहाण

नाशिक : नाशिकरोड भागात घरफोडी व हाणामारीच्या घटना घडल्याचे समोर आहे आहे.   देवळालीगाव मालधक्का रोड गुलाबवाडी येथे बंद घराच्या दरवाजाचे कडी कुलूप तोडून अज्ञात चोरट्याने सुमारे सव्वा दोन लाख रुपयांचा ऐवज चोरून नेला. तर   जेलरोड नारायण बापू चौकात कंपनीच्या कामगारांना सोडणाऱ्या बस चालकास मारहाण झाल्याची घटना घडली आहे. 
देवळालीगाव गुलाबवाडी वीटभट्टीजवळ राहणाऱ्या संजना मनोहर महाले यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, रविवारी रात्री साडे अकरा वाजेनंतर व सोमवारी पहाटे 5 वाजेच्या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी महाले यांच्या बंद घराच्या मुख्य दरवाजा कडी कोंडा तोडून घरात प्रवेश केला. घरातील लोखंडी कपाटाचे ड्रॉवरमध्ये ठेवलेले सोन्या चांदीचे दागिने व रोकड असा एकूण 2 लाख 19 हजार हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर  जेलरोड नारायण बापू चौकात कंपनीच्या कामगारांना सोडणाऱ्या बस चालकास बस माझ्या जवळच का आणली या कारणावरून हातावर काचेची दारूची बाटली मारून जखमी केले. तसेच कंपनीच्या बसची पुढील काच फोडून नुकसान केले.          उपनगर महारुद्र कॉलनी येथे राहणारे विजय कृष्णा अहिरे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, सोमवारी रात्री साडेअकरा वाजेच्या सुमारास ग्लासको कंपनीची बस एम एच 15 ई एफ 645 हिच्यामधून कंपनीच्या कामगारांना घरी सोडत होतो. जेलरोड नारायण बापू चौक अभिनव शाळेजवळ संशयित शंकर किसन जाधव रा. लोखंडे मळा, जेलरोड याने बस माझ्याजवळ का आणली अशी कुरापत काढून अहिरे यांना शिवीगाळ करत हातावर काचेची दारूची बाटली मारून दुखापत केली. तसेच दारूची बाटली बसच्या पुढील काचवर फेकून काच फोडून नुकसान केले. याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आ

Web Title: Incidents of burglary and violence in Nashik Road area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.