अंबड औद्योगिक वसाहतीत लुबाडण्याच्या घटना वाढल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2021 08:56 PM2021-08-26T20:56:50+5:302021-08-26T20:57:05+5:30

नाशिक : अंबड औद्योगिक वसाहत परीसरात अंधाराचा फायदा घेत काही कामगारांना रात्रीच्या सुमारास लुटण्याचे प्रकार पुन्हा एकदा वाढू लागल्याने कामगारांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

Incidents of looting increased in Ambad industrial estate | अंबड औद्योगिक वसाहतीत लुबाडण्याच्या घटना वाढल्या

अंबड औद्योगिक वसाहतीत लुबाडण्याच्या घटना वाढल्या

googlenewsNext
ठळक मुद्देकामगारांमध्ये भिती : लाइट नसल्याने अंधाराचा फायदा घेत होतेय लूट

नाशिक : अंबड औद्योगिक वसाहत परीसरात अंधाराचा फायदा घेत काही कामगारांना रात्रीच्या सुमारास लुटण्याचे प्रकार पुन्हा एकदा वाढू लागल्याने कामगारांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या अनेक महिन्यांपासून बंद असलेले छोट्या-मोठ्या कंपन्या पुर्ववत सुरु झाल्या असून वसाहतीत कामगारांची वर्दळ देखील वाढली आहे. मात्र या अंबड औद्योगिक वसाहतीतील रस्त्यांवर रात्रीच्या वेळेस अनेक पोलवरील लाईट सतत बंदच असल्याने अंधार पसरलेला असतो, या संधीचा फायदा घेत अनेक चोर-लुटारुंनी याभागात रात्री बेरात्री येवून एकटा दुकटा कामगार पाहून त्यांना मारहाण करणे, त्याच्याकडील मोबाईल, पैसे व ऐवज लुटणे सुरु केले आहे. दोन दिवसांपुर्वीच अंबडमधील एका कंपनीतील कामगारांना मध्यरात्रीच्या सुमारास ते घरी परतत असताना काही
चोरट्यांनी आडवून काही समजण्याच्या आत त्यांना मारहाण करीत चोरट्यांनी मोबाईल व पैसे घेऊन पोबारा केला.

या एमआयडीसीच्या रस्त्यांवर काही ठिकाणी अंधार तर काही ठिकाणी वाढलेल्या झाडांमुळे लाइे असूनही अंधार पसरलेला असल्याने या अंधारात कामगारांच्या लुटीचे प्रकार वाढत असल्याने रात्रीच्या सुमारास कामगार ये-जा करण्यास भिती व्यक्त करीत आहेत. दरम्यान या हद्दीतील पोलिस ठाणे व रात्रीची गस्त घालणारे पोलिस पथक, कर्मचारी फारसे फिरकत नसल्याने चोरट्यांना ते अधिक फावत असल्याचेकामगार वर्गात बोलले जात आहे.

Web Title: Incidents of looting increased in Ambad industrial estate

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.