विनयभंगाच्या घटना ठरताहेत डोकेदुखी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 9, 2021 04:11 AM2021-07-09T04:11:22+5:302021-07-09T04:11:22+5:30
नाशिक शहरात पोलीस आयुक्त अंतर्गत इंदिरा नगर, भद्रकाली, उपनगर, नाशिकरोड, देवळाली कॅम्प, पंचवटी, म्हसरूळ, गंगापूर, सरकारवाडा, अंबड, सातपूर, आडगाव ...
नाशिक शहरात पोलीस आयुक्त अंतर्गत इंदिरा नगर, भद्रकाली, उपनगर, नाशिकरोड, देवळाली कॅम्प, पंचवटी, म्हसरूळ, गंगापूर, सरकारवाडा, अंबड, सातपूर, आडगाव आदी पोलीस ठाण्यांत विनयभंगाचे गुन्हे दिवसेंदिवस वाढतच आहे. यामध्ये शेजाऱ्यांची भांडणे, ओळखीच्या मित्रांकडून अश्लील बोलणे, वाहनतळात वाहने उभी करण्यावरून वाद यांसारख्या भांडणाचे रूपांतर विनयभंगाच्या गुन्ह्यात होत आहेत. भांडणाच्या वेळी अश्लील चाळे किंवा अश्लील हावभाव केले म्हणून विनयभंग हा गुन्हा दाखल करण्यात येतो, अशा घटना घडत असताना सुमारे ६० टक्के घटनांमध्ये संबंधित संशयित आरोपीची पत्नी-मुले समवेत असताना हा इसम अश्लील चाळे कसे करू शकतो, असा प्रश्न पोलिसांपुढे उभा राहत आहे. तरीदेखील विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात येत असल्याने संबंधित व्यक्तीची बदनामी आणि व कोर्टाच्या पायऱ्या झिजविण्यात आर्थिक व मानसिक त्रासाला सामोरे जावे लागत आहे.