तेलताडा योजनेत नाशिकचा समावेश करा
By admin | Published: June 30, 2015 12:33 AM2015-06-30T00:33:58+5:302015-06-30T00:35:06+5:30
तेलताडा योजनेत नाशिकचा समावेश करा
नाशिक : तेलताडा योजनेत नाशिक जिल्'ाचा समावेश करून मोठ्या प्रमाणात तेलताडाचे उत्पन्न जास्त क्षेत्रात लागवड करण्याबाबत तसेच तलताडापासून उत्पादित माल विकत घेण्यासाठी नाशिक जिल्'ात समावेश करावा, असा ठराव कृषी समितीच्या मासिक बैठकीत करण्यात आला. कृषी व पशुसंवर्धन सभापती केदा अहेर यांच्या उपस्थितीत समितीची मासिक बैठक झाली. शासनाच्या धोरणानुसार १ ते ७ जुलै याकालावधीत कृषी सप्ताह साजरा करण्याबाबत तालुकानिहाय आढावा घेण्यात येऊन मोठ्या प्रमाणात कृषिदिन व कृषी सप्ताह साजरा करण्याबाबतच्या सूचना सभापती केदा अहेर यांनी दिल्या. आत्मा, जलसंपदा, मस्त्यव्यवसाय, महाबीज, वीजवितरण कंपनी आदि विभागांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. आत्मा प्रकल्पांतर्गत खरीप हंगामासाठी २०० शेतकऱ्यांना प्रशिक्षण देण्यात येणार असल्याची माहिती कृषी अधिकाऱ्यांनी दिली. प्रत्येक तालुक्यासाठी त्यासाठी ५० हजारांचे अनुदान वितरीत करण्यात आले आहे. जलयुक्त शिवार अभियानाचा आढावा घेण्यात आला. खरीप हंगामात बि-बियाणे व खतांचा तुटवडा न भासू देण्याबाबत सूचना देऊन योग्य दरात व योग्य प्रतींचे बि-बियाणे व खते शेतकऱ्यांना पुरवठा करण्याबाबत सभापती केदा अहेर यांनी कृषी विभागाला सूचना दिल्या. बैठकीस केरू पवार, सुभाष चौधरी, श्रीमती भावना भंडारी, रंजना पवार, सुनीता चव्हाण, अर्जुन बर्डे, जिल्हा कृषी अधिकारी ज्ञानेश्वर बोराडे आदि उपस्थित होते.(प्रतिनिधी)