पेठ तालुक्याचा अवघड क्षेत्रात समावेश करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2021 04:14 AM2021-04-25T04:14:19+5:302021-04-25T04:14:19+5:30
शिक्षक बदली धोरणात अवघड व सोपे असे दोन क्षेत्र गृहित धरले जात असून, पेठ तालुका भौगोलिकदृष्ट्या शासनाच्या निकषाप्रमाणे अवघड ...
शिक्षक बदली धोरणात अवघड व सोपे असे दोन क्षेत्र गृहित धरले जात असून, पेठ तालुका भौगोलिकदृष्ट्या शासनाच्या निकषाप्रमाणे अवघड क्षेत्रात येतो. त्यामुळे बदली प्रक्रिया राबविताना तालुक्यातील सर्व गावे अवघड क्षेत्रात समाविष्ट करण्यात यावीत तसेच पेसा क्षेत्रातील तालुक्यांना स्वतंत्र टॅब उपलब्ध करून द्यावेत, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. याप्रसंगी आदिवासी शिक्षक संघटनेचे माजी राज्याध्यक्ष मनोहर टोपले, तालुकाध्यक्ष राजेंद्र भोये, गोवर्धन खंबाईत, धनराज सगणे, रवींद्र लहारे, लहांगे, कुंदे, पारधी यांच्यासह शिक्षक प्रतिनिधी उपस्थित होते.
फोटो - २४ पेठ टीचर
विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांना निवेदन देताना मनोहर टोपले, रवींद्र लहारे, राजेंद्र भोये, गोवर्धन खंबाईत, धनराज सगणे, लहांगे, कुंदे, पारधी आदी.