ट्रान्सपोर्ट व्यावसायिकांचा पॅकेजमध्ये समावेश करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2020 09:40 PM2020-05-22T21:40:55+5:302020-05-22T23:50:56+5:30
नाशिक : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने घोषित केलेल्या २० लाख कोटींच्या पॅकेजमध्ये ट्रान्सपोर्ट व्यवसायासाठी कुठलीही ठोस तरतूद नसल्याने केंद्र शासनाने ट्रान्सपोर्ट व्यवसायासाठी विशेष तरतूद करावी, अशी मागणी नाशिक ट्रान्सपोर्ट असोसिएशनने केली आहे.
नाशिक : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने घोषित केलेल्या २० लाख कोटींच्या पॅकेजमध्ये ट्रान्सपोर्ट व्यवसायासाठी कुठलीही ठोस तरतूद नसल्याने केंद्र शासनाने ट्रान्सपोर्ट व्यवसायासाठी विशेष तरतूद करावी, अशी मागणी नाशिक ट्रान्सपोर्ट असोसिएशनने केली आहे.
याबाबत नाशिक ट्रान्सपोर्ट असोसिएशनचे अध्यक्ष राजेंद्र फड, नाशिक गुड्स ट्रान्सपोर्टचे अध्यक्ष पी. एम. सैनी यांनी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन व रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशात निर्माण झालेल्या परिस्थितीत विविध उपाययोजना केंद्र सरकारच्या वतीने करण्यात येत आहे. त्यासाठी नुकतेच आपण २० लाख कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर केले आहे. यामध्ये विविध क्षेत्रांसाठी आर्थिक पॅकेजची घोषणा करण्यात आली आहे. देशाच्या अर्थव्यवस्थेत महत्त्वपूर्ण स्थान असलेल्या आणि अत्यावश्यक सेवेत महत्त्वाची
भूमिका बजावणाऱ्या ट्रान्सपोर्ट क्षेत्राला केंद्र सरकारच्या आर्थिक पॅकेजमध्ये वाटा मिळालेला नसल्याने परिणामी अगोदरच संकटात सापडलेल्या ट्रान्सपोर्ट क्षेत्राला यामुळे अधिक फटका बसणार असून, याचे दूरगामी परिणाम होऊ शकतात. त्यामुळे अत्यावश्यक
सेवेत आपली महत्त्वाची भूमिका बाजवणा-या ट्रान्सपोर्ट उद्योगाला विशेष पॅकेज जाहीर करण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली आहे.
-----
तीव्र नाराजी
देशात अत्यावश्यक सेवेत महत्त्वाची भूमिका बजावणाºया ट्रान्सपोर्ट क्षेत्राला मात्र कुठलीही ठोस आर्थिक मदत जाहीर करण्यात न आल्याने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आपला जीव धोक्यात घालून काम करणारे ट्रान्सपोर्ट व्यवसायातील सर्व घटक केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे तीव्र नाराजी
पसरली आहे.