पेठ तालुक्यातील पाच खेळाडूंचा समावेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2021 04:16 AM2021-02-24T04:16:27+5:302021-02-24T04:16:27+5:30
---------------------------------- तोंडवळची यात्रा रद्द पेठ : सालाबादाप्रमाणे पेठ तालुक्यातील तोंडवळ येथे फेब्रूवारी महिन्यात भरणारी खंडेराव महाराज यांची यात्रा ...
----------------------------------
तोंडवळची यात्रा रद्द
पेठ : सालाबादाप्रमाणे पेठ तालुक्यातील तोंडवळ येथे फेब्रूवारी महिन्यात भरणारी खंडेराव महाराज यांची यात्रा या वर्षी कोरोना विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी रद्द करण्यात आली असून व्यावसायिक व भाविक यांनी कोणत्याही प्रकारची दुकाने लावू नये असे आवाहन सरपंच यशोदा चौधरी , उपसरपंच त्रंबक प्रधान , ग्रामसेवक पी.जे.सुरसे यांचे सह पोलीस प्रशासनाने केले आहे.
--------------------------------------------
शिक्षण अधिकाऱ्यांनी घेतली लस
पेठ - पंचायत समितीच्या गटशिक्षणाधिकारी सरोज जगताप यांचेसह शिक्षण विभागातील विस्तार अधिकारी, केंद्रप्रमूख, गटसाधन केंद्र व कार्यालयीन कर्मचारी आदींना येथील ग्रामीण रुग्णालयात कोरोना प्रतिबंधक लसीकरण करण्यात आले. सदरची लस एकदम सुरक्षित असून उर्वरीत शिक्षकांसह अधिकारी व कर्मचाऱ्यांनी लसीकरण करून घ्यावे असे आवाहन गटशिक्षणाधिकारी सरोज जगताप यांनी केले आहे.
---------------------------------------
पेठ बस आगारात प्रवासी दिन साजरा
पेठ : राज्य परिवहन महामंडळाच्या पेठ आगाराच्या वतीने येथील बसस्थानकामध्ये प्रवासी दिन साजरा करण्यात आला. आगार प्रमूख स्वप्नील आहिरे यांच्या उपस्थितीत बसने प्रवास करणाऱ्या जेष्ठ प्रवाशांचा यावेळी गुलाबपुष्प देऊन सत्कार करण्यात आला.कोरोना काळातही प्रवाशांच्या सेवेत एसटी कर्मचारी व अधिकारी तत्पर असल्याने आहिरे यांनी सर्वांचे कौतुक केले.
-------------------------------
गुणवत्ता कक्ष बैठकीत चर्चा
पेठ : समग्र शिक्षा अभियान अंतर्गत पेठ तालुका गुणवत्ता कक्षाची बैठक गटशिक्षणाधिकारी सरोज जगताप यांच्या उपस्थितीत बैठक झाली. यावेळी नवोदय परीक्षा, कोरोना काळातील शाळांचे नियोजन, लसीकरण, रूम टू रीड आदी विषयांवर चर्चा करण्यात आली. याप्रसंगी सर्व विस्तार अधिकारी, केंद्र प्रमूख, विशेष शिक्षक, गुणवत्ता कक्ष सदस्य उपस्थित होते.केंद्रप्रमुख मोतीराम सहारे यांनी सूत्रसंचलन केले.