रेड झोनमध्ये समावेशाने शहरवासीय धास्तावले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2020 10:17 PM2020-05-20T22:17:49+5:302020-05-20T23:59:18+5:30

नाशिक : कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता राज्य सरकारने लॉकडाउनच्या चौथ्या टप्प्यात नाशिकचा समावेश रेड झोनमध्ये केला असून, अत्यावश्यक सेवाच सुरू ठेवण्याची मुभा दिल्याने गेल्या दोन आठवड्यांपासून पूर्वपदावर आलेले जनजीवन पुन्हा विस्कळीत होण्याच्या भीतीने शहरवासीय धास्तावले आहेत. शासनाने रेड झोन जाहीर करतानाच काही नियम, निकष ठरवून दिले असून, त्याबाबत जनतेत संभ्रम असल्याने पुन्हा पूर्वीसारखेच सर्व व्यवसाय बंद होतात की काय? असा प्रश्न व्यावसायिकांना पडला आहे.

 The inclusion in the red zone frightened the townspeople | रेड झोनमध्ये समावेशाने शहरवासीय धास्तावले

रेड झोनमध्ये समावेशाने शहरवासीय धास्तावले

Next

नाशिक : कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता राज्य सरकारने लॉकडाउनच्या चौथ्या टप्प्यात नाशिकचा समावेश रेड झोनमध्ये केला असून, अत्यावश्यक सेवाच सुरू ठेवण्याची मुभा दिल्याने गेल्या दोन आठवड्यांपासून पूर्वपदावर आलेले जनजीवन पुन्हा विस्कळीत होण्याच्या भीतीने शहरवासीय धास्तावले आहेत. शासनाने रेड झोन जाहीर करतानाच काही नियम, निकष ठरवून दिले असून, त्याबाबत जनतेत संभ्रम असल्याने पुन्हा पूर्वीसारखेच सर्व व्यवसाय बंद होतात की काय? असा प्रश्न व्यावसायिकांना पडला आहे.
देशात सर्वत्र वेगाने फैलावणाऱ्या कोरोनाला रोखण्यासाठी देशात व राज्यात २३ मार्चपासून लॉकडाउन, संचारबंदी जारी करण्यात आली असून, अत्यावश्यक सेवा वगळता सर्व व्यवसाय, उद्योगधंदे, कामे बंद करण्यात आली होती. कोरोना रुग्णांची संख्या लक्षात घेता शासनाने संचारबंदी व लॉकडाउनमध्ये दर पंधरा दिवसांनी टप्प्याटप्प्याने शिथिलता आणली आहे.
साधारणत: ३ मेपासून सरकारने बºयापैकी सर्वच व्यावसायिकांना दिलासा देत सर्व अपवाद वगळता व्यवसाय सुरू करण्यास परवानगी दिली होती. त्यामुळे बºयापैकी जनजीवन पूर्वपदावर येऊन नागरिकांच्या हाताला कामे मिळाली. व्यवसाय सुरू झाल्याने बाजारात चहलपहल वाढली होती. जीवनावश्यक वस्तूंशिवाय अन्य साºया बाबी बाजारात उपलब्ध झाल्यामुळे नागरिकांची मोठी गैरसोय दूर झाली. त्यामुळे यापुढेदेखील सर्व दैनंदिन व्यवहार पूर्ववत होतील, अशी आशा बाळगली जात असताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लॉकडाउनच्या चौथ्या टप्प्यात दि. २२ मेपासून नव्याने रेड झोन जाहीर करून त्यासाठी काही निर्बंध कायम ठेवले.
-------------------------------------
उपाययोजनांकडे सर्वांचे लक्ष
नाशिकचा समावेश रेड झोनमध्ये करण्यात आला आहे. रेड झोनमध्ये काही निर्बंध लादण्यात आल्यामुळे सुरू झालेले व्यवसाय, दुकाने व कामधंदे बंद होतात की काय? अशी भीती नागरिकांना वाटू लागली आहे. यासंदर्भात बुधवारी व्यापारी, व्यावसायिक, लहान-मोठ्या दुकानदारांमध्ये संभ्रम दिसून आला. रेड झोनमध्ये काय काय उपाययोजना स्थानिक स्तरावर केल्या जातात याकडे साऱ्यांचे लक्ष लागून असले तरी, शुक्रवारपासून सारेच पुन्हा बंद होते की काय या भीतीपोटी नागरिकांनी खरेदीसाठी सकाळपासून काही प्रमाणात गर्दी केली होती.

Web Title:  The inclusion in the red zone frightened the townspeople

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक