मालेगाव आगाराचे बुडाले आठ कोटी ८४ लाखांचे उत्पन्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 8, 2020 10:34 PM2020-08-08T22:34:08+5:302020-08-09T00:17:01+5:30
मालेगाव : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाचा फटका राज्य परिवहन महामंडळालाही बसला आहे. मालेगाव आगाराचे गेल्या चार महिन्यांत आठ कोटी ८४ लाख रुपयांचे उत्पन्न बुडाले आहे. लालपरी पुन्हा रस्त्यावर धावल्यानंतरच आगाराची आर्थिक परिस्थिती सुधारण्याची चिन्हे दिसत आहेत.
मालेगाव : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाचा फटका राज्य परिवहन महामंडळालाही बसला आहे. मालेगाव आगाराचे गेल्या चार महिन्यांत आठ कोटी ८४ लाख रुपयांचे उत्पन्न बुडाले आहे. लालपरी पुन्हा रस्त्यावर धावल्यानंतरच आगाराची आर्थिक परिस्थिती सुधारण्याची चिन्हे दिसत आहेत.
राज्यात कोरोनाने कहर केला आहे. प्रारंभी मालेगाव कोरोनाचे हॉटस्पॉट ठरले होते. परिणामी मालेगावहून बाहेरगावी जाणाऱ्या व बाहेरून मालेगावी येणाºया सर्वच एसटी बसेसला गेल्या २२ मार्चपासून प्रवेशबंदी करण्यात आली आहे. ती आजतागायत तशीच आहे. परिणामी मालेगाव आगाराचे प्रतिदिन ७ लाख रुपयांचे आर्थिक नुकसान होत आहे. महिन्याकाठी दोन कोटी २१ लाख रुपयांच्या उत्पन्नाला मुकावे लागत आहे. गेल्या चार महिन्यांत मालेगाव आगाराच्या उत्पन्नात कमालीची घट झाली आहे. लॉकडाऊन काळात आगाराला आठ कोटी ८४ लाख रुपयांच्या उत्पन्नावर पाणी सोडावे लागल्याने आगाराची स्थिती खालावली आहे. मालेगाव आगारात एकूण ४५० कर्मचारी कार्यरत आहेत. यात एक आगारप्रमुख, दोन बसस्थानक प्रमुख, १८० चालक, १७० वाहक, ७ मेकॅनिक यांचा समावेश आहे. गेल्या चार महिन्यांपासून ७५ बसेस आगारात उभ्या आहेत. ग्रामीण भागाची जनवाहिनी म्हणून ओळखल्या जाणाºया बसेस सध्या धूळ खात आहेत. जिल्ह्यातील काही भागातील मार्गांवर बसेस सुरू करण्यात आल्या आहेत. मात्र महाराष्टÑ, गुजरात, मध्य प्रदेश राज्यांच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या मालेगाव आगारात बससेवा सुरू न झाल्यामुळे प्रवाशांचे हाल होत आहेत. सध्या केवळ मागणी असेल त्याप्रमाणे मालवाहतूक बसेस सुरू आहेत.कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे शासनाने निर्गमित केलेल्या आदेशानुसार बससेवा बंद ठेवण्यात आली आहे. यामुळे आगाराचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे. हे नुकसान भरून काढणे शक्य नसल्याने आर्थिक अडचण निर्माण होणार आहे. आदेश आल्या नंतरच बससेवा पूर्ववत सुरू करू.
- के. बी. धनवटे,
आगारप्रमुख, मालेगाव