नाशिकमध्ये बिल्डरर्सच्या आस्थापनांवर छापे; ७५ ठिकाणी झाडाझडती
By संजय पाठक | Published: April 20, 2023 12:13 PM2023-04-20T12:13:30+5:302023-04-20T12:14:14+5:30
सुमारे दीडशे व्यवसायिक या व्यवसायात आहेत. ज्या चार बिल्डर्सवर छापे टाकण्यात आले.
नाशिक- शहरातील चार प्रमुख बिल्डर्सवर आयकर खात्याने छापे टाकले असून त्यामुळे खळबळ उडाली आहे. शहरातील चारही प्रतिष्ठीत बिल्डरांच्या नाशिकसह राज्यातील सुमारे ७५ ठिकाणी एकाच वेळी हे छापे टाकण्यात आले आहेत.
नाशिक शहरातील या बिल्डरांची निवासस्थाने, फार्म हाऊस, कार्यालये, उप कार्यालये, त्यांचे कायदेशीर सल्लागार, मॅनेजर आणि व्यवस्थापक यावर छापे टाकण्यात आले आहेत. याशिवाय अन्य जिल्ह्यात कार्यालये असतील तर तेथेही झाडाझडती सुरू असल्याचे सांगण्यात आले.
सुमारे दीडशे व्यवसायिक या व्यवसायात आहेत. ज्या चार बिल्डर्सवर छापे टाकण्यात आले. त्यातील काही जणांच्या बांधकाम साईट जोरात आहे तर काही जण केवळ जमिन खरेदी विक्री व्यवहारात मोठे मानले जातात. त्यामुळे आयकर विभागाच्या छाप्यातून काय मिळते याकडे लक्ष लागून आहे.