मालेगावमध्ये बीफ व्यापाऱ्यांवर आयकरचे छापे
By ऑनलाइन लोकमत | Published: January 18, 2023 10:29 AM2023-01-18T10:29:11+5:302023-01-18T10:31:36+5:30
मालेगाव ( नाशिक) - देशासह परदेशातही बीफ निर्यात करणाऱ्या अल फैज कंपनीच्या मालेगावस्थित कार्यालयावर मुंबई व पुणे आयकर विभागाने ...
मालेगाव ( नाशिक) - देशासह परदेशातही बीफ निर्यात करणाऱ्या अल फैज कंपनीच्या मालेगावस्थित कार्यालयावर मुंबई व पुणे आयकर विभागाने मंगळवारी छापा टाकला. तीन वाहनांद्वारे पोहोचलेल्या अधिकाऱ्यांकडून रात्री उशिरापर्यंत तपासणी सुरू होती. दरम्यान, पथकाने शहरातून एका चार्टर्ड अकाउंटंटला चौकशीकामी ताब्यात घेतल्याचे समजते.
मुंबई आग्रा महामार्ग अलगत पवारवाडी शिवारात हा बीफ कारखाना आहे. या कारखान्यातून जनावरांची मांस निर्यात केली जाते. गेल्या अनेक वर्षांपासून हा कारखाना सुरू आहे. शासनाचा कर चुकवल्याने आयकर विभागाने छापेमारी केल्याची समोर आले आहे.