इगतपुरीत महसुल कर्मचारी संपावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 5, 2019 02:49 PM2019-09-05T14:49:30+5:302019-09-05T14:49:52+5:30
घोटी : राज्यातील महसुल कर्मचाऱ्यांच्या मागण्या तत्वत: मंजुर होऊनही अद्यापपर्यंत शासन निर्णय काढले जात नाही.
घोटी : राज्यातील महसुल कर्मचाऱ्यांच्या मागण्या तत्वत: मंजुर होऊनही अद्यापपर्यंत शासन निर्णय काढले जात नाही. म्हणून महाराष्ट्र राज्य महसुल कर्मचारी संघटनेने शासनाच्या आश्वासनावर मागील आंदोलन स्थगित केले होते. मात्र आश्वासन देऊनही मागण्या पुर्ण न केल्याने कर्मचाऱ्यांनी गुरूवारपासुन बेमुदत कामबंद संप सुरु केला आहे. याबाबत इगतपुरी तहसील कार्यालयातील महसुल कर्मचाºयांनी तहसीलदार वंदना खरमाळे यांना निवेदन देण्यात आले. महसुल कर्मचा-यांच्या संपामुळे सर्वसामान्य जनतेची हाल होत आहे. यामुळे सेतु कार्यालयाचे कामकाज ठप्प होणार असल्याने सर्व प्रकारचे दाखले मिळणार नाही. तसेच शेती महसुल आदी कामेही बंद रहाणार आहे. यावेळी अव्वल कारकून एम. आर. कुलकर्णी, व्ही. एस. वाघ, एस. व्ही. बोराडे, एस. डी. मंडलीक, जी. जी. महाजन, एस. के. अहीरे, वाय. ए. गोवर्धने, आर. एस. भालेराव, पी. एस. पाटील, एम. के. डोंगरे, एस. एस. भालेराव, व्ही. ए. पदमेरे, एस. डी. खाडे, आर. जी. भालेराव, पी. आर. रोहेरा, पी. यु. उपासनी, एस. एस. केंगले, एल. आर. नागरे, बी. एस. भावसार, डी. एस. तायडे, बी. एस. पालवे, एम. ए. देशमुख, पी. सी. कोकणे, आर. के. घुलुम, एस. एस. वारे आदींनी तहसीलदार वंदना खरमाळे यांना निवेदन देऊन बेमुदत संप सुरू केला आहे. इगतपुरी तहसीलदार कार्यालयातील कामकाज ठप्प झाले आहे.