ग्रामीण कॉँग्रेसमध्ये इनकमिंग सुरू

By admin | Published: February 1, 2017 01:37 AM2017-02-01T01:37:16+5:302017-02-01T01:37:30+5:30

जिल्हा परिषद : शिवसेनेचे उत्तम ठमके यांनी तोडले शिवबंधन

Incoming Congress in Rural Congress | ग्रामीण कॉँग्रेसमध्ये इनकमिंग सुरू

ग्रामीण कॉँग्रेसमध्ये इनकमिंग सुरू

Next

नाशिक : शहर कॉँग्रेसमध्ये मनसेचे नगरसेवक गुलजार कोकणी यांच्या रूपाने कॉँग्रेसमध्ये सुरू झालेले इनकमिंग जिल्हा ग्रामीण कॉँग्रेसमध्येही सुरू झाले असून, मंगळवारी (दि.३१) शिवसेनेचे उत्तम ठमके यांनी कार्यकर्त्यांसह कॉँग्रेसमध्ये प्रवेश केला.
गुलजार कोकणींप्रमाणेच उत्तम ठमके यांनाही गोवर्धन गटातून उमेदवारी निश्चित झाल्याची चर्चा आहे. मंगळवारी (दि.३१) जिल्हा कॉँग्रेस कमिटीत जिल्हाध्यक्ष राजाराम पानगव्हाणे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा प्रवेश झाला. उत्तम ठमके यांच्या कॉँग्रेस प्रवेशामुळे गोवर्धन गटात कॉँग्रेसची ताकद वाढल्याचा दावा राजाराम पानगव्हाणे यांनी केला आहे. उत्तम ठमके यांच्याबरोबरच दत्ताराम बेंडकोळी यांनीही कॉँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. त्यांचीही गोवर्धन गणातून उमेदवारी निश्चित मानली जात आहे. गुलजार कोकणी यांनी मनसेतून कॉँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांची थेट उमेदवारी जाहीर झाल्याची चर्चा होती. तोच प्रकार गोवर्धन गट व गणाच्या बाबतीत झाल्याचे समजते. शिवसेनेतून कॉँग्रेसमध्ये प्रवेश करणारे उत्तम ठमके यांची गोवर्धन गटातून, तर दत्ताराम बेंडकोेळी यांची गोवर्धन गणातून उमेदवारी निश्चित मानली जात आहे. याप्रसंगी रमेश कहांडोळे, सुनील आव्हाड, प्रशांत बाविस्कर, पंचायत समिती सदस्य प्रकाश बदादे, ज्ञानेश्वर गायकवाड, रतन जाधव, अंबादास ढिकले, हिरामण गायकर, हिरामण ताठे, बाळासाहेब लिलके, रामभाऊ रोकडे, सखाराम पारधी, अरुण गायकवाड, दौलत डावरे, मंजुळाबाई गायकवाड, सुभाष कोरडे, दिलीप थेटे, अशोक डांबळे आदि उपस्थित होते. (प्रतिनिधी)

Web Title: Incoming Congress in Rural Congress

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.