पावसामुळे आवक घटली; कोथिंबीर १०० रु पये जुडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 31, 2019 01:18 AM2019-10-31T01:18:35+5:302019-10-31T01:18:51+5:30
: परतीच्या पावसाने हजेरी लावल्याने शेतातील उभे पीक धोक्यात आले आहे. पावसामुळे आवक घटल्याने सर्व शेतमालाचे बाजारभाव तेजीत आले आहेत. बुधवारी (दि.३०) कृषी उत्पन्न बाजार समितीत विक्रीला आलेल्या कोथिंबिरीला प्रतिजुडी १०० रुपये असा बाजारभाव मिळाला.
पंचवटी : परतीच्या पावसाने हजेरी लावल्याने शेतातील उभे पीक धोक्यात आले आहे. पावसामुळे आवक घटल्याने सर्व शेतमालाचे बाजारभाव तेजीत आले आहेत. बुधवारी (दि.३०) कृषी उत्पन्न बाजार समितीत विक्रीला आलेल्या कोथिंबिरीला प्रतिजुडी १०० रुपये असा बाजारभाव मिळाला. मागील आठवड्यापासून अवकाळी पावसाने जोर धरला आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी शेतातील उभे पीक धोक्यात आले आहे. परिणामी शेतमालाची आवक घटल्याने बाजारभाव तेजीत आले आहेत. गेल्या आठवड्यात कोथिंबीरची १५ हजार रुपये शेकडा दराने विक्री झाली होती. तर बुधवारच्या दिवशी पुन्हा कोथिंबीर आवक घटल्याने बाजारभाव तेजीत आले. सायंकाळी झालेल्या लिलावात कोथिंबीर प्रतिजुडी १०० रुपये दराने विक्र ी झाली.