अपूर्ण पेयजल योजना : टँकरद्वारे गावाला पुरविले पाणीतीन गावे अद्यापही तहानलेलीच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2017 12:29 AM2017-12-31T00:29:02+5:302017-12-31T00:30:59+5:30
अपूर्ण पेयजल योजनेमुळे गावात टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात आला. यावेळी महिलांची उडालेली झुंबड.
सायखेडा : निफाड तालुक्यातील भेंडाळी, औरंगपूर, महाजनपूर येथील अपूर्ण राष्ट्रीय पेयजल योजनेचा फटका नागरिकांना बसला आहे. महिलांना पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागत आहे. योजना अपूर्ण असूनदेखील पंचायत समितीस्तरावर ठेकेदाराने रक्कम काढून घेतल्याने अपूर्ण कामांमुळे तीन गावांवर पाणीटंचाईची वेळ आली आहे. नागरिकांच्या मदतीने टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात आला असला तरी भविष्याचे काय, असा प्रश्न भेडसावत आहे.
१ कोटी २७ लाख रु पये खर्च करून तीन गावांची संयुक्त राष्ट्रीय पेयजल योजना मंजूर झाली. अनेक दिवसांपासून करंजगाव येथून नवीन पाईपलाईन टाकणे, पाण्याची टाकी बांधणे, गावात मुख्य पाईपलाईन फिरवणे अशी कामे चालू होती. मात्र कामांच्या इंस्टीमेन्टमध्ये पाण्याच्या टाकीला संरक्षण जाळी बसवणे, केबल, मोटार बदलणे, ठिकठिकाणी व्हॉल बसवणे , टाकीच्या जिन्याला रिलिंग करणे हे कामे अपूर्ण असल्याने योजना ग्रामपंचायतींने ताब्यात घेतली नाही. कामे पूर्ण झाल्याशिवाय योजना ताब्यात घेऊ नये असा ठराव ग्रामसभेत केला. ठरावाची नक्कल व ग्रामस्थांच्या स्वाक्षरी असलेला अर्ज ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ यांनी पंचायत समीतीच्या संबंधित अधिकारी आणि विभागाला दिला होता. तरी देखील काम पूर्णत्वाची शहानिशा न करता ठेकेदाराने पैसे काढून घेतले. त्यामुळे अपूर्ण योजना ग्रामपंचायत व ग्रामसेवक यांना न विचारता पैसे दिल्याने आठ दिवसापासून केबल जळाल्यामुळे पाणी पुरवठा बंद आहे. ग्रामसभेचा ठराव व ग्रामस्थांच्या पत्राला या निमित्त केराची टोपली दाखविण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे. पाणीपुरवठ्याची कामे पूर्ण झाल्याशिवाय योजना ताब्यात घेऊ नये असा ठराव ग्रामसभेत केला. ठरावाची नक्कल, ग्रामस्थांच्या स्वाक्षरी असलेला अर्ज पंचायत समितीच्या संबंधित अधिकारी आणि विभागाला दिला होता. तरीदेखील काम पूर्णत्वाची कोणतीही शहानिशा न करता समितीस्तरावर ठेकेदार यांनी पैसे काढून घेतले. आठ दिवसांपासून केबल जळाली आहे. त्यामुळे गावांना पाणीपुरवठा बंद आहे.
- शरद खालकर, ग्रामपंचायत सदस्य