अपुरी माहिती : अधिकाऱ्यांचा बेजबाबदारपणा पुन्हा उघड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2018 01:59 AM2018-07-18T01:59:36+5:302018-07-18T02:00:38+5:30
नाशिक : जिल्हा परिषदेची सभा असो की मुख्य कार्यकारी अधिकाºयांची आढावा बैठक अधिकाºयांकडून दिशाभूल करण्याचे आणि त्यातून वादंग होण्याचे प्रकार अनेकदा घडल्यानंतरही अपुºया माहितीच्या आधारेच अधिकारी बैठकांना उपस्थित राहात असल्याची बाब पुन्हा एकदा अधोरेखित झाली. जलव्यवस्थापन आणि स्वच्छतेबाबतची माहिती विसंगत दिल्याप्रकरणी कनिष्ठ सहायकाची एक वेतनवाढ वर्षासाठी बंद करण्याचे आदेश मुख्य कार्यकारी अधिकाºयांनी दिले.

जिल्हा परिषद अध्यक्ष शीतल सांगळे यांच्या अध्यक्षतेखाली जलव्यवस्थापन व स्वच्छता समितीची मासिक सभा घेण्यात आली. या बैठकीसाठी संबंधित सर्व विभागांची माहिती संकलित करून विषयानुसार पृष्ठांकन करून जिल्हा परिषद पदाधिकारी, सदस्य व अधिकाºयांना आढावा घेण्यासाठी उपलब्ध करून देण्याची जबाबदारी जिल्हा परिषदेच्या लघु पाटबंधारे (पूर्व) विभागाची आहे. सदरचे काम या विभागातील कनिष्ठ सहायक शैलेन्द्र जाधव यांच्याकडे आहे. यापूर्वीही त्यांना परिपूर्ण माहिती तयार करून बैठकीसाठी सदर करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. मात्र तरीदेखील १२ जुलै रोजी झालेल्या बैठकीत आढावा घेण्यासाठीची माहिती विस्कळीत स्वरूपात दिल्यामुळे जिल्हा परिषद पदाधिकारी व सदस्यांनी नाराजी व्यक्त केली होती. याबाबत संबंधित कनिष्ठ सहायकास जबाबदार धरून त्यांची एक वेतनवाढ पुढील वेतनवाढीवर परिणाम होणार नाही, अशा पद्धतीने बंद करण्याचे आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गिते यांनी दिले आहेत.