भगूरच्या अंगणवाडी सेविकांना नाही सुरक्षा किट !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2020 04:25 PM2020-06-24T16:25:33+5:302020-06-24T16:35:16+5:30

भगूर : शहरातील अंगणवाडी सेविकांना घरोघरी जाऊन करोनासंदर्भात चौकशी करून सेवा करावी लागत आहे. मात्र त्यांना कुठल्याही प्रकारची सुरक्षा ...

Inconvenience to Bhagur's Anganwadi workers due to lack of safety kit | भगूरच्या अंगणवाडी सेविकांना नाही सुरक्षा किट !

भगूरच्या अंगणवाडी सेविकांना नाही सुरक्षा किट !

Next
ठळक मुद्देकरोनासंदर्भात सेवा घरोघरी जाऊन चौकशी

भगूर : शहरातील अंगणवाडी सेविकांना घरोघरी जाऊन करोनासंदर्भात चौकशी करून सेवा करावी लागत आहे. मात्र त्यांना कुठल्याही प्रकारची सुरक्षा किट दिली जात नसल्याने गैरसोय होत आहे.
भगूर परिसरात कोरोनो विषाणू तपासणी करता अंगणवाडी सेविका घरोघरी जाऊन सेवा बजावत आहेत. त्यांना कुठलीही सुरक्षा नसून सेविकांना कोरोना होण्याची शक्यता नाकारता येत नाही. याची दखल घेऊन भगूर नगरपालिकेने सेविकांसाठी लवकरात लवकर सेफ्टी किट उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी महाराष्ट्र नविनर्माण सेनेच्या वतीने करण्यात आली आहे. पालिकेचे मालमत्ता अधिकारी अनिल बिजलपुरे यांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे, अंगणवाडी सेविकांना कोरोनाची लागण झाल्यास त्यास नगरपालिका जबाबदार राहील. यावेळी सुमित चव्हाण, राजेश गायकवाड, श्याम देशमुख, संतोष सोनवणे, हरीष देशमुख, अभिषेक चव्हाण, दिनेश कातकडे, यश राजपूत, ओम गायकवाड, ऋ षी गायकवाड आदी उपस्थित होते.

 

Web Title: Inconvenience to Bhagur's Anganwadi workers due to lack of safety kit

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.