इंदिरानगर परिसरात आधार केंद्र सुरू न झाल्याने नागरिकांची गैरसोय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 26, 2017 03:47 PM2017-11-26T15:47:06+5:302017-11-26T15:48:15+5:30
प्रत्येक ठिकाणी विद्यार्थ्यांपासून ते ज्येष्ठांपर्यंत सर्वांनाच आधारकार्ड आहे आधार कार्ड नवीन काढणे लिंक करणे पत्ता बदलणे किंवा मोबाइल क्रमांक बदलले यासह विविध तुरटी बदलण्यासाठी आधार कार्ड केंद्रात वर ये जा करावी लागते परंतु परिसरात आधारकार्ड केंद्रच नसल्याने विद्यार्थी आणि नागरिकांना शहरातील आधार कार्ड केंद्रावर ये जा करावे लागते
इंदिरानगर : परिसरात अद्यापही आधार कार्ड केंद्र सुरू न झाल्याने नागरिकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे परिसात आधार केंद्राची संख्या वाढवण्याची मागणी करून सुद्धा संबंधित विभाग दखल घेत नसल्याने विद्यार्थी आणि नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे
परिसरात दिवसागणिक उपनगरे वाढत असल्याने त्याचबरोबर लोकवस्ती झपाट्याने वाढत आहे तसेच परिसरात गेल्या काही दिवसांपासून आधार कार्ड केंद्र बंद असल्याने नागरिकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे. आता प्रत्येक ठिकाणी विद्यार्थ्यांपासून ते ज्येष्ठांपर्यंत सर्वांनाच आधारकार्ड आहे आधार कार्ड नवीन काढणे लिंक करणे पत्ता बदलणे किंवा मोबाइल क्रमांक बदलले यासह विविध तुरटी बदलण्यासाठी आधार कार्ड केंद्रात वर ये जा करावी लागते परंतु परिसरात आधारकार्ड केंद्रच नसल्याने विद्यार्थी आणि नागरिकांना शहरातील आधार कार्ड केंद्रावर ये जा करावे लागते. त्यामुळे वेळ व आर्थिक त्रासास सामोरे जावे लागत आहे तातडीने विद्यार्थी आणि नागरिकांची होणारी गैरसोय लक्षात घेऊन आधार कार्ड केंद्र सुरू करावे अशी मागणी त्रस्त नागरिकांनी केली आहे.