कपालेश्वर ग्रामीण रुग्णालयात रुग्णाची गैरसोय
By Admin | Published: December 22, 2016 11:31 AM2016-12-22T11:31:52+5:302016-12-22T15:16:41+5:30
ऑनलाइन लोकमत जोरण (नाशिक), दि. २२ - बागलाण तालुक्यातील पश्चिम पट्टयातील कपालेश्वर येथिल ग्रामीण रुग्णालयात परिसरातील गोर गरीब, आदिवासी, ...
ऑनलाइन लोकमत
जोरण (नाशिक), दि. २२ - बागलाण तालुक्यातील पश्चिम पट्टयातील कपालेश्वर येथिल ग्रामीण रुग्णालयात परिसरातील गोर गरीब, आदिवासी, हातमजुरी करणारे बहुतांश प्रमाणात रुग्ण येतात. परंतु रुग्णालयात आले की येथील रुग्णालयात वेळेवर वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी हजर राहत नसून स्थानिक ग्रामस्थ, व परिसरातील ग्रामस्थांनी अनेक वेळा तक्रार करुनही अद्याप कुठल्याही प्रकारे दखल घेतली जात नाही.
एकीकडे शासन म्हणते गोर गरीबांसाठी २४ तास सेवा देणारा ग्रामीण रुग्णालये आपल्या परिसरात दिले आहेत. येथील कर्मचारी, वैद्यकीय अधिकारी मुख्यालयास राहत नसून बाहेर राहत असल्यामुळे वेळेवर पोहचत नाही. तसेच परिसरातील किकवारी, विंचुरे, जोरण, कपालेश्वर, कऱ्हाळेपाडा, आदी गावांचा समावेश येतो. रुग्णांना दोन, चार, किलोमीटरची पायपीठ करत जवळील दवाखान्यात धाव घेतात परंतु रुग्णालयात सकाळी दहा ते साडे दहाच्या दरम्यान वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी वेळेवर राहत नाही. मात्र येणाऱ्या या रुग्णांना एखाद्याला भाऊ, दादा करुन दुसरीकडे पोहचवण्याची सोय करावी लागत आहे.
अनेक वेळा कपालेश्वर येथिल ग्रामिण रुग्णालयाची तक्रार केली. रुग्णालयाच्या कारभाराविषयी माहीती देवून कुठल्याही अधिकारी यांनी दखल घेतली नाही.
- गोविंदा बागुल, सामाजिक कार्यकर्ते; कपालेश्वर.
बाहेरुन येणारे जे रुग्ण आहेत त्यांची मोठ्या प्रमाणात हेळसांड होते व परिसरात रुग्णालय राहुन उपयोग काय?
– सुरेश महाले; सभापती; जोरण अदिवासी विविध कार्यकारी सोसायटी
https://www.dailymotion.com/video/x844m6o