बस थांबत नसल्याने विद्यार्थ्यांची गैरसोय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 20, 2018 04:34 PM2018-10-20T16:34:02+5:302018-10-20T16:35:34+5:30
ओझर : गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित उड्डाणपूल व भुयारी मार्गाचे काम प्रगतीपथावर असताना बस येथे थांबत नसल्याने विद्यार्थी वैतागले आहेत. यामुळे दोन तीन तास कॉलेज स्टॉपवर उभे राहून विद्यार्थी महामार्गावरील वाहनांच्या वेगाचा सामना करत आहे. ओझर महाविद्यालयाजवळील थांबा मृत्यूचे केंद्रबिंदू ठरण्याची चिन्हे आहेत.
ओझर : गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित उड्डाणपूल व भुयारी मार्गाचे काम प्रगतीपथावर असताना बस येथे थांबत नसल्याने विद्यार्थी वैतागले आहेत. यामुळे दोन तीन तास कॉलेज स्टॉपवर उभे राहून विद्यार्थी महामार्गावरील वाहनांच्या वेगाचा सामना करत आहे.
ओझर महाविद्यालयाजवळील थांबा मृत्यूचे केंद्रबिंदू ठरण्याची चिन्हे आहेत.
हे महाविद्यालय महामार्गावरील टिळकनगर समोर असून सकाळी कॉलेज सुटण्याची वेळ अकराची असताना सुकेणे बस साडेदहाला येऊन जात असल्याने त्यानंतर तब्बल दीड वाजेपर्यंत मुले-मुली भर उन्हात याच दरम्यान काही बस चालक मात्र थांबा असताना सरळ निघून जात असल्याने अनेक जण बस पकडण्याच्या नादात खाली पडून जखमी झाले आहेत.
एकीकडे भुयारी कामामुळे सर्व वाहन सर्व्हिसरोडने जात असून त्याच ठिकाणी जीव मुठीत धरून कमी जागेत हे सर्व विद्यार्थी उभे असतात. दिक्षी, जिव्हाळे, दात्याने, थेरगाव, ओने व कसबे, मौजे सुकेणे, मोहाडी, जानोरी, आंबे जानोरी, शिवणई आदी ठिकाणाहून सुमारे ३००,४०० मुले-मुली दररोज प्रवास करतात.
याविषयी सीबीएस येथून त्यावेळी सुटणारी बस तेथूनच अर्धा तास उशिराने सुटल्यास त्याचा लाभ सर्वांनाच होणार आहे.चत्यामुळे एसटी प्रशासनाने सदर गंभीर बाबींची तातडीने दखल घेण्याची गरज असून त्यामुळे सर्वांचीच वेळेची बचत होऊन होणारे अपघात टाळले जावू शकतात.
सदर ठिकाणी अंडरपासचे काम चालु असल्याने तात्पुरते निवारा शेड उभारण्यात यावे तसेच काही सिटीबसचे वाहक चालक बस रिकामी असताना देखील येथे थांबण्यास टाळाटाळ करतात. त्यामुळे याठिकाणी महामार्गावर अधिकृत थांबा असताना बस पकडायची गरज काय असा सवाल विद्यार्थी विचारत आहे.
काही सिटीबस चालक विद्यार्थ्यांना त्रास देतात. एक बस निघून गेल्यावर तासनतास ताटकळत उभे राहावे लागत आहे. पिंपरी बस दहाव्या मैलापासून वळण घेत असताना सुध्दा वाहक बसण्यास मज्जाव करतात परिणामी कडक उन्हात एकदीड किलोमीटर पायी जावे लागते.
- अभिषेक कुलकर्णी, विद्यार्थी, मोहाडी.
ओझर महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांच्या प्रश्नाबाबत अनेक तक्र ारी आल्या आहेत. सदर बाब पिंपळगाव आगारप्रमुखांना सांगितली असून दोन भरारी पथके याठिकाणी चार तास थांबून कारवाही करणार आहे.
-नितीन मैंद, विभागप्रमुख, नाशिक.