उमराणेच्या पोलीस चौकीला असुविधांची बाधा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 4, 2020 04:37 AM2020-12-04T04:37:33+5:302020-12-04T04:37:33+5:30

देवळा पोलीस ठाणेअंतर्गत तालुक्यात उमराणे येथे पोलीस औट पोष्टची निर्मिती करण्यात आली आहे. ह्या पोलीस चौकीत सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक ...

Inconvenience to Umrane police station | उमराणेच्या पोलीस चौकीला असुविधांची बाधा

उमराणेच्या पोलीस चौकीला असुविधांची बाधा

Next

देवळा पोलीस ठाणेअंतर्गत तालुक्यात उमराणे येथे पोलीस औट पोष्टची निर्मिती करण्यात आली आहे. ह्या पोलीस चौकीत सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक अशोक फसाले यांच्या मार्गदशर्नाखाली अवघे चार पोलीस कर्मचारी उमराणे, दहीवड, खारीपाडा, डोंगरगाव, चिंचवे, वव्हाळे, तिसगाव, गिरणारे, सांगवी, कुंभार्डे ह्या गावातील कायदा व सुव्यवस्था सांभाळतात. परिसराची लोकसंख्या तसेच उमराणे येथून गेलेला राष्ट्रीय महामार्ग, यामुळे सातत्याने वाढत जाणारी गुन्ह्यांची संख्या पाहता ही कर्मचारी संख्या अपुरी पडत असल्याची नागरिकांची तक्रार आहे. उमराणे ग्रामपंचायतीने दोन वर्षांपूर्वी पोलीस चौकीसाठी जागा उपलब्ध करून दिली आहे; परंतु अद्याप तेथे इमारतीचे बांधकाम झालेले नाही. ग्रामपंचायतीच्या मालकीच्या जागेत ग्रामस्थांच्या सहकार्याने उभारलेल्या एका जागेत सध्या ही पोलीस चौकी असून, येथे कोणत्याही सुविधा नाहीत. उमराणा येथे कांद्याची मोठी बाजारपेठ असल्यामुळे दररोज कोट्यवधी रुपयांची उलाढाल होते. देशभरातून येणारी मालवाहतूक करणारी वाहने, त्याबरोबर येणारे परप्रांतीय मजूर व कांदा विक्रीसाठी येणारी वाहने यामुळे गाव गजबजलेले असते. ह्या गर्दीमुळे गुन्हेगारीदेखील वाढत आहे.

त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस कर्मचाऱ्यांची संख्या वाढविण्यात यावी तसेच पोलीस चौकीसाठी स्वतंत्र इमारतीचे बांधकाम करण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली आहे.

फोटो - उमराणे येथील दुरवस्था झालेली पोलीस चौकी.

फोटो- ०१ देवळा १

Web Title: Inconvenience to Umrane police station

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.