पाण्याच्या टाकीअभावी गैरसोय
By admin | Published: February 1, 2016 10:45 PM2016-02-01T22:45:12+5:302016-02-01T22:48:57+5:30
ठाणगाव : ग्रामसभेत विविध विषयांवर चर्चा
ठाणगाव : सिन्नर तालुक्यातील ठाणगाव येथे आयोजित ग्रामसभेत विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. यावेळी अनेक ठराव मंजूर करण्यात आले.
सरपंच नामदेव शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली मारुती मंदिरात झालेल्या ग्रामसभेत ग्रामविकास अधिकारी बी.एस. भोसले यांनी १४ व्या वित्त आयोगातून प्राप्त झालेल्या १५ लाख ३० हजार रुपयांच्या निधीतून करावयाच्या कामांचा आढावा घेतला. घरपट्टी आकारणीच्या नवीन नियमांविषयी यावेळी माहिती देण्यात आली.
ग्रामपंचायतीने सांडपाण्याचे नियोजन करण्याची मागणी यावेळी करण्यात आली. घरासमोर पथदीप नाही व परिसरात साफसफाई होत नाही, त्यामुळे याबाबतचा कर आकारण्यात येऊ नये, अशी मागणी संजय शिंदे यांनी केली.
ग्रामसभेस अनुपस्थित असलेल्या शासकीय अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करण्याची मागणी यावेळी करण्यात आली. १४ व्या वित्त आयोगातील निधीतून दलीत वस्तीत विकास कामे करण्याची मागणी सरपंच व ग्रामविकास अधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली.
याप्रसंगी तलाठी वाय. आर. गावित, आण्णासाहेब काकड, अरुण केदार, किरण बोऱ्हाडे, नामदेव फोडसे, पोपट शिंदे, उत्तम शिंदे, दिनेश भोर, अशोक गायकवाड, तानाजी शिंदे आदिंसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. (वार्ताहर)