वीज बिलात छुप्या पद्धतीने आकारणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 29, 2018 12:57 AM2018-10-29T00:57:29+5:302018-10-29T00:58:00+5:30

औद्योगिक कारखान्यांच्या वीज बिलात मोठ्या प्रमाणात छुप्या पद्धतीने वीज बिलाची रक्कम आकारण्यात येत असून, उद्योजकांनी बिले तपासूनच भरावीत, असे आवाहन आयमाचे सरचिटणीस ललित बूब यांनी केले.

 Incorrect levy on electricity bill | वीज बिलात छुप्या पद्धतीने आकारणी

वीज बिलात छुप्या पद्धतीने आकारणी

Next

सिडको : औद्योगिक कारखान्यांच्या वीज बिलात मोठ्या प्रमाणात छुप्या पद्धतीने वीज बिलाची रक्कम आकारण्यात येत असून, उद्योजकांनी बिले तपासूनच भरावीत, असे आवाहन आयमाचे सरचिटणीस ललित बूब यांनी केले. आयमा हाउस येथे उद्योजकांना आपल्या कारखान्याची वीज बिलांची अद्ययावत माहिती व कशाप्रकारे वीज बिलांचा तपशील बघायचा या विषयावर शुक्रवारी (दि. २६) आयोजित चर्चासत्रात बूब बोलत होते.
यावेळी आयमाचे अध्यक्ष वरुण तलवार, उपाध्यक्ष निखिल पांचाल, माजी अध्यक्ष राजेंद्र अहिरे, निमाचे माजी अध्यक्ष मंगेश पाटणकर, सुदर्शन डोंगरे, राजेंद्र पानसरे, आयमा पावर कमिटीचे चेअरमन विजय जोशी, नोवा पवार क्वॉलिटीचे एनर्जी आॅडिटर सचिन वाखारे आदी उपस्थित होते.
ललित बूब यांनी सांगितले की, औद्योगिक कारखान्यांच्या वीज बिलांमध्ये कुठल्याही प्रकारच्या सूचना न येता मोठ्या प्रमाणात छुप्या पद्धतीने वेगवेगळ्या कारणांसाठी रक्कम वाढविण्यात आली आहे. त्या वीज बिलांचे विश्लेषण बघण्यास उद्योजकांना वेळ नसतो. त्या वीज बिलांची पडताळणी कशाप्रकारे करावी, वीज बिलाचे वाचन कसे करावे व समजावून घ्यावे, असेही शेवटी तलवार यांनी सांगितले.
यावेळी नोवा पावर क्वॉलिटीचे एनर्जी आॅडिटर सचिन वाखारे यांनी पावर प्रेझेंटेशन करताना पॉवर फॅक्टरमधील बदलांबाबत व समतोल साधण्याबाबत माहिती दिली. आपल्या कारखान्याच्या  आलेल्या वीज बिलांबाबतच्या  संपूर्ण स्पष्टीकरणासह  कोणकोणत्या पद्धतीने चार्जेस  लावले गेले आहेत याबाबत संपूर्णपणे सविस्तर माहिती दिली. तसेच आपण काही उपाययोजना केल्या तर पावर क्वॉलिटीतही फरक जाणवेल व पावर सेव्हिंगही होईल, असे सांगितले. यात उद्योजकांना आपल्या कारखान्यातील वीज बिलातील बदल व वाचन तसेच नवीन वाढलेले  पावर टेरिफ याची सखोल माहिती दिली.
पावर फॅक्टरमधील बदल त्याचे कॅल्क्युलेशन, लॉसेसबाबत तसेच कपॅसिटर, मीटर बदलण्याबाबत नवीन नियमावली व विजेच्या बचतबाबत पावर प्रेझेंटेशन देऊन समजावून सांगण्यात आले.  सूत्रसंचालन व आभार आयमाचे उपाध्यक्ष निखिल पांचाल यांनी मानले. यावेळी राजेंद्र कोठावदे, एन. टी. गाजरे, अविनाश मराठे, राहुल गांगुर्डे आदी उपस्थित होते.

Web Title:  Incorrect levy on electricity bill

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.