संगणकीय चुकीने कर्मचारी ‘मालामाल’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2019 11:37 PM2019-05-18T23:37:04+5:302019-05-19T00:14:51+5:30
महापालिकेतील काही अधिकारी व कर्मचाऱ्यांनी भविष्य निर्वाह निधीतील जमा रकमेवर कर्जाची मागणी केल्यानंतर त्यांच्या खात्यावर मागणी केलेल्या रकमेच्या दुप्पट रक्कम खात्यात जमा झाल्याचा प्रकार महापालिकेत घडला. संगणकीय चूक लक्षात आल्यानंतर वित्त व लेखा विभागात धावपळ उडाली.
नाशिक : महापालिकेतील काही अधिकारी व कर्मचाऱ्यांनी भविष्य निर्वाह निधीतील जमा रकमेवर कर्जाची मागणी केल्यानंतर त्यांच्या खात्यावर मागणी केलेल्या रकमेच्या दुप्पट रक्कम खात्यात जमा झाल्याचा प्रकार महापालिकेत घडला. संगणकीय चूक लक्षात आल्यानंतर वित्त व लेखा विभागात धावपळ उडाली.
मनपा अस्थापनावरील अधिकारी व कर्मचारी यांचा भविष्य निर्वाह निधी स्वतंत्रपणे मनपातील पीएफ खात्यात जमा केला जातो. आस्थापनावरील अधिकारी-कर्मचाऱ्यांचा भविष्य निर्वाह निधी दरमहा पगाराच्या ठराविक टक्के रक्कम त्यांच्या खात्यात जमा होते. या जमा रकमेतून ठराविक रक्कम आजारपण, लग्न व इतर आवश्यक कामांकरिता कर्ज रूपाने दिली जाते. हे काम वित्त व लेखा विभागातून केले जाते. अशा कर्ज मागणीच्या यादीतील सुमारे ९० जणांना कर्ज मंजूर झाल्यानंतर त्यांच्या बँक खात्यात कर्ज मंजूर रक्कम जमा करण्याचे काम वित्त विभागातून झाल्यानंतर संगणकीय चुकीतून कर्मचाºयांच्या खात्यात त्यांच्या मागणीपेक्षा दुप्पट रक्कम जमा झाल्याचा प्रकार घडला. काही तासांनी हा प्रकार काही कर्मचाºयांमुळे लक्षात आला.
तत्काळ वित्त विभागाकडून बँकेतून ८५ हून अधिक जणांची रक्कम रोखण्यात येऊन त्यांच्या खात्यात जमा झालेल्या दुप्पट रकमेतून वळती करण्यात आली, तर ५ जणांशी संपर्क साधत काढलेली रक्कम तत्काळ बँकेत जमा करण्यात आली. महापालिकेच्या कर्मचारी, अधिकाºयांमध्ये या प्रकाराची जोरदार चर्चा झडली असताना वित्त विभागाकडून मात्र गोपनीयता पाळण्यात आली.