सिन्नर तालुक्यात नव्याने 10 कोरोनाबधित रुग्णांची वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2020 05:57 PM2020-06-27T17:57:35+5:302020-06-27T17:57:57+5:30
सिन्नर: सिन्नर शहरात 6 तर ग्रामीण भागात 4 अशा 10 रुग्णाचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याने सिन्नर तालुक्यातील चिंतेत भर पडली आहे.
सिन्नर: सिन्नर शहरात 6 तर ग्रामीण भागात 4 अशा 10 रुग्णाचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याने सिन्नर तालुक्यातील चिंतेत भर पडली आहे.
शनिवारी दुपारी 10 रुग्ण कोरोना बाधित असल्याचा अहवाल आल्याने तालुक्यातील रुग्णसंख्या 80 झाली आहे. यातील 37 रुग्ण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना घरी सोडून देण्यात आले असले तरी नव्याने रुग्णाची संख्या वाढत असल्याने प्रशासन व आरोग्य विभागाच्या काळजी वाढली आहे.
सिन्नर येथील 30 अहवाल दुपारी प्राप्त झाले. त्यात 20 अहवाल निगेटिव्ह असले. शहरात 6 रुग्ण वाढले तर ग्रामीण भागात 4 रुग्णांची आज भर पडली आहे. रेणुका नगर मध्ये दोन रुग्ण पॉझिटिव्ह आले असून त्यात 31 वर्षीय महिला व 16 वर्षीय युवतीचा समावेश आहे. विद्यावर्धिनी नगर मध्ये 35 वर्षीय युवकाला कोरोणाचा संसर्ग झाला आहे. सरदवाडी रोडवरील द्वारका नगर मध्ये तीन रुग्ण आढळले असून त्यात 36 वर्षीय पुरुष, 21 वर्षीय महिला व दोन वर्षीय मुलीचा समावेश आहे. विंचूरदळवी येथे 72 वर्षीय महिला व 27 वर्षीय युवक, माळेगाव येथे 45 वर्षीय पुरुष तर धुळवड येथे 60 वर्षीय महिलेला कोरोणाचा संसर्ग झाला आहे. अजून 21 अहवाल प्रलंबित आहेत. नागरिकांनी कामाव्यतिरिक्त घराबाहेर पडू नये असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.