मालेगावी दिवसभरात ५३ कोरोनाबाधितांची वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2021 04:21 AM2021-02-26T04:21:38+5:302021-02-26T04:21:38+5:30
शहरातील कोरोना बाधितांची संख्या आता १७४ इतकी झाली आहे तर तालुक्यात ४० बाधीत आढळून आले आहेत. त्यामुळे आरोग्य विभागापुढे ...
शहरातील कोरोना बाधितांची संख्या आता १७४ इतकी झाली आहे तर तालुक्यात ४० बाधीत आढळून आले आहेत. त्यामुळे आरोग्य विभागापुढे पुन्हा आव्हान उभे ठोकले आहे. मालेगावात सर्वाधिक काेरोना बाधित रुग्ण हे कॅम्प, सोयगाव आणि संगमेश्वर भागात आढळून येत आहेत. दररोज एक-दोन बाधीत मिळत असताना अचानक तो आकडा दररोज दहा ते पंधरा रुग्णांपर्यंत गेला होता. परंतु आता मात्र अत्यंत वेगात बाधीतांची संख्या वाढू लागली असून शहरवासियांत प्रचंड घबराट पसरली आहे. गेल्या काही महिन्यातील हा सर्वाधिक आकडा आहे. मास्कचा वापर न करता फिरणाऱ्यांचीही संख्या वाढली आहे. त्याचा परिणाम म्हणूनच की काय अत्यंत वेगात शहरात कोरोना फैलावू लागला असून नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.