नाशिकच्या सिडको-अंबड लिंक रोडवर अपघातात वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 3, 2017 01:11 PM2017-12-03T13:11:45+5:302017-12-03T13:13:05+5:30
माणिकनगर, उपेंद्रनगर भागात सायंकाळच्या वेळी वर्दळ वाढल्याने सुसाट वाहनामुळे अपघात
नाशिक : सिडको-अंबड लिंक रोड या सिडको परिसरातील अत्यंत वर्दळीच्या रस्त्यावर वारंवार अपघात होत असून शेकडो जणांना आजवर प्राण गमवावे लागले आहे.
माणिकनगर, उपेंद्रनगर भागात सायंकाळच्या वेळी वर्दळ वाढल्याने सुसाट वाहनामुळे अपघात होत आहेत. त्याला आळा घालण्यासाठी भाजी मार्केटजवळ गतिरोधक टाकावेत तसेच पांढरे पट्टे (झेब्रा क्रॉसिंग) मारावेत, अशी मागणी होत आहे.
माणिकनगर, उपेंद्रनगर, उत्तमनगर आदी भागातील रहिवासी सायंकाळच्या वेळी भाजी घेण्यासाठी माणिकनगर भाजीमार्केट येथे येतात. त्याचवेळी अंबड व सातपूरमधील अनेक औद्योगिक कंपन्यांचे कर्मचारी व कामगार सुटी झाल्याने परत येतात. त्यातच पाथर्डी फाट्याकडे जाणारे येणारे ट्रक व अजवड वाहनेदेखील भरधाव वेगाने येतात. तसेच या भागातील काही प्राथमिक व माध्यमिक शाळा सुटल्याने मुलांची रस्त्यावर गर्दी असते. त्यामुळे रस्ता ओलांडतांना सर्वांची चांगली धांदल उडते. त्यामुळे अनेकवेळा छोटे मोठे अपघात होतात. वाहतूक कोंडी तर नित्याचीच बनली आहे. त्यामुळे माणिकनगर भाजी मार्केटजवळ रस्ता दुभाजकानजीक पांढरे पट्टे मारावेत. तसेच गतिरोधक बसवावेत, अशी मागणी करण्यात आली आहे.