अपघातप्रवण क्षेत्रात वाढ !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 30, 2020 11:02 PM2020-01-30T23:02:42+5:302020-01-31T00:48:11+5:30

देवळा-सौंदाणे रस्त्यावर मेशी फाट्याजवळ बस आणि आॅटो रिक्षा विहिरीत कोसळल्यामुळे झालेल्या अपघातात २६ प्रवाशांना आपले प्राण गमवावे लागले. तालुक्याच्या इतिहासात आतापर्यंत झालेल्या अपघातात सर्वाधिक प्राणहानी झालेली घटना म्हणून नोंदली जाईल. भावडघाटात १८ वर्षांपूर्वी साक्री आगाराची बस दरीत कोसळल्यामुळे वीस प्रवाशांना आपले प्राण गमवावे लागल्याची आठवण यामुळे ताजी झाली.

Increase in accidental area! | अपघातप्रवण क्षेत्रात वाढ !

मेशी फाट्यावरील हा तीव्र उताराचा वळण रस्ता बस व रिक्षाच्या भीषण अपघातास कारणीभूत ठरला.

Next
ठळक मुद्देदेवळा : १८ वर्षांपूर्वी भावडघाटात बस कोसळल्याची आठवण ताजी

देवळा : तालुक्यात देवळा-सौंदाणे रस्त्यावर मेशी फाट्याजवळ बस आणि आॅटो रिक्षा विहिरीत कोसळल्यामुळे झालेल्या अपघातात २६ प्रवाशांना आपले प्राण गमवावे लागले. तालुक्याच्या इतिहासात आतापर्यंत झालेल्या अपघातात सर्वाधिक प्राणहानी झालेली घटना म्हणून नोंदली जाईल. भावडघाटात १८ वर्षांपूर्वी साक्री आगाराची
बस दरीत कोसळल्यामुळे वीस प्रवाशांना आपले प्राण गमवावे लागल्याची आठवण यामुळे ताजी झाली.
एवढे अपघात होऊनही तालुक्यातील अपघातप्रवण क्षेत्रात वाढच होत असल्याचे दिसून येत आहे. तालुक्यात भावडघाट ते देवळा, देवळा-कळवण रस्त्यावरील भऊरफाटा, देवळा- सटाणा रस्त्यावर माळवाडी फाटा व देवळा सौंदाणे रस्त्यावर खुंटेवाडी व मेशी फाट्याजवळ असलेला वळण रस्ता हे सर्वाधिक अपघातप्रवण क्षेत्र असून या ठिकाणी आतापर्यंत सर्वाधिक अपघात झालेले आहेत. शेकडो जणांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागाने या सर्व अपघातप्रवण क्षेत्रात आवश्यक तेथे वाहनचालकांना सूचित करणारे सूचनाफलक लावण्याची तसेच या सर्व अपघातप्रवण वळण रस्त्यांचे विस्तारीकरण व मजबुतीकरण करण्याची आवश्यकता आहे.

तीव्र उतारामुळे वाहने सुटतात सुसाट
विंचूर प्रकाशा (राज्यमार्ग क्र .७) या मार्गावरून मोठ्या प्रमाणात राज्य व आंतरराज्य वाहतूक सुरू असते. यात अवजड वाहनांचे प्रमाण लक्षणीय आहे. या रस्त्यावर भावडघाट ते देवळा शहर या सुमारे १० कि.मी. अंतरात झालेल्या अपघातात आतापर्यंत अनेकांना आपले जीव गमवावे लागले आहेत. भावडघाटाकडून देवळ्याकडे तीव्र उतार असल्याने वाहने सुसाट येतात, यामुळे चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने, तसेच ओव्हरटेक करताना अनेक अपघात झाले आहेत. भावडघाटाच्या पायथ्याशी असलेला वळण रस्ता वाहनचालकांसाठी मृत्यूचा सापळा ठरला आहे. आतापर्यंत सर्वाधिक अपघात याच ठिकाणी झाले आहेत. या मार्गावर दुचाकीस्वारांना जीव मुठीत धरून दुचाकी चालवावी लागते. या मार्गाचे त्वरित विस्तारीकरण करण्याची आवश्यकता आहे.
अनेक ठिकाणी रस्त्यांवर व्यावसायिक अतिक्र मण करतात, फलक लावतात त्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होतो तसेच अपघात होण्याची शक्यता वाढते. डांबरी रस्ता खोदून जलवाहिनी टाकण्याचे प्रकार दिसून येतात. त्यामुळे रस्त्याचे नुकसान होते. त्याची योग्य ती डागडुजी करीत नाहीत. त्या जागेवरील डांबर उखडल्यानंतर नवीन डांबर, खडी आदी टाकले जात नाही. यामुळे खड्डे पडून रस्त्यांचे नुकसान होते व अपघाताची शक्यता वाढते. या गोष्टीची जबाबदारी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे असते, परंतु याकडे दुर्लक्ष होत असल्यामुळे या बाबी सर्रास सुरू असतात.

रस्त्याच्या दुरुस्तीचा नुसताच सोपस्कार
गतवर्षी देवळा-मालेगाव रस्त्यावरील खुंटेवाडी फाट्यावर यावल आगाराच्या सप्तशृंगगडावरून भाविकांना घेऊन जाणाऱ्या बसला अपघात झाला होता, त्यात ३९ भाविक जखमी झाले होते. वळणावर चालकाचा बसवरील ताबा सुटल्यामुळे हा अपघात झाला होता. सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत रस्त्यावरील खड्ड्यांची दुरु स्ती करण्याचा सोपस्कार पूर्ण केला जातो. ही दुरु स्ती करताना गुणवत्ता राखली जाते का? हा एक मोठा प्रश्नच आहे, कारण दुरु स्तीनंतर महिनाभरातच रस्त्यावर पुन्हा खड्डे पडतात. यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या गुणवत्ता व नियंत्रण विभागाच्या कामावर प्रश्नचिन्ह उपस्थित होते.

Web Title: Increase in accidental area!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Accidentअपघात