दिशादर्शक फलक नसल्याने अपघातात वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2021 06:28 PM2021-02-14T18:28:17+5:302021-02-14T18:28:44+5:30
नांदूरवैद्य : नाशिक - मुंबई या राष्ट्रीय महामार्गाला जोडणारा अतिशय महत्त्वाचा समजला जाणारा बेलगाव कुऱ्हे ते व्हीटीसी या ८ किलोमीटर असणाऱ्या रस्त्याला दिशादर्शक फलक तसेच विजेची सोय नसल्यामुळे या रस्त्यावर महिनाभरापासून अपघातांच्या प्रमाणात वाढ होत आहे. संबंधित विभागाने लक्ष देऊन या ठिकाणी दिशादर्शक फलक तसेच रस्त्यावर िजेची सोय करावी, अशी मागणी व्यावसायिक तसेच नागरिकांनी केली आहे.

बेलगाव कुऱ्हे ते व्हीटीसी हा रस्ता नाशिक-मुंबई या राष्ट्रीय महामार्गाला जोडणारा व सतत रहदारीने गजबजलेला अतिशय महत्त्वाचा समजला जातो. बेलगाव ते व्हीटीसी दरम्यान असलेल्या या रस्त्यावर अनेक वळणदार मार्ग असून रस्त्याच्या दुतर्फा झाडे आहेत. यामुळे या वळणदार असलेल्या ठिकाणी दिशादर्शक फलक नसल्याने चालकांना समोरून येणाऱ्या गाडीचा अंदाज येत नाही. परिणामी अपघाताला सामोरे जाण्याच्या घटना वाढत आहेत.
दोन दिवसांपूर्वी एक वॅगन आर गाडी या ठिकाणी वीजेची सुविधा नसल्यामुळे पलटी झाली. तसेच हा रस्ता जंगल भागातून जात असल्याने या परिसरात जंगली हिंस्र प्राण्यांचा रात्रीच्या वेळी रस्त्यावर वावर असल्यामुळे या रस्त्याला विजेची सोय करण्यात यावी.
ब्रिटिशकालीन असलेल्या दारणा धरणावर जाणारे पर्यटक याच रस्त्याने जात असतात. तसेच परिसरातील व्यावसायिक, औद्योगिक वसाहतींमध्ये रोजगारासाठी जाणारे कामगार रात्रीच्या वेळी जात असतात. शिवाय नाशिकला जाण्यासाठी अतिशय महत्त्वाचा रस्ता असल्याने या रस्त्यावर महिन्याभरापासून अपघातांच्या प्रमाणात वाढ होत आहे. या ठिकाणी दिशादर्शक फलक तसेच विजेची सोय करण्यात यावी, अशी मागणी परिसरातील ग्रामस्थांनी केली आहे.