मोकाट श्वानांमुळे अपघातांत वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2020 04:13 AM2020-12-29T04:13:34+5:302020-12-29T04:13:34+5:30
बेशिस्त वाहनचालकांवर कारवाईची मागणी नाशिक : शहरातील अनेक सिग्नलवर काही दुचाकीस्वार न थांबता, भरधाव वेगाने पुढे निघून जातात, यामुळे ...
बेशिस्त वाहनचालकांवर कारवाईची मागणी
नाशिक : शहरातील अनेक सिग्नलवर काही दुचाकीस्वार न थांबता, भरधाव वेगाने पुढे निघून जातात, यामुळे अपघात होण्याची शक्यता वाढली आहे. अनेक चौकात वाहतूक पोलीस उपस्थित राहात नसल्याने बेशिस्त वाहनचालकांमुळे अनेक वेळा वाहतूक कोंडी होते. काही वेळा वाहनचालकांमध्ये बाचाबाचीचे प्रकारही घडतात. बेशिस्त वाहनचालकांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे.
भाजीपाल्याचा कचरा रस्त्यावर
नाशिक : शहरातील अनेक भाजीबाजारांमध्ये विक्रेत्यांकडून कचरा रस्त्यावर फेकला जात असल्याने या परीसरात अस्वच्छता निर्माण होते. यामुळे परिसरात दुर्गंधी पसरते. रस्त्यावर कचरा फेकणाऱ्या विक्रेत्यांवर महापालिकेने कारवाई करावी, अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून होत आहे. विविध आजारांच्या रुग्णसंख्येत वाढ
नाशिक : वातावरणातील बदलामुळे विविध साथीच्या आजारांचा फैलाव होत असल्याने रुग्णसंख्येत वाढ झाली असल्याचे दिसून येत आहे. शहरातील अनेक डाक्टरांच्या क्लिनिकमध्ये रुग्णांची गर्दी दिसून येत आहे. नागरिकांनी आरोग्याची काळजी घेऊन गरज असेल, तरच घराच्या बाहेर पडावे, असा सल्ला डॉक्टरांकडून दिला जात आहे.
ग्रामीण भागातील रस्त्यांची दुरवस्था
नाशिक : जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील अनेक रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. या रस्त्यांवर मोठमोठे खड्डे पडले असल्याने, या रस्त्यांवरून वाहन चालविताना वाहनचालकांना मोठी कसरत करावी लागत आहे. अनेक वेळा रस्त्यांबाबत तक्रारी करूनही त्याची दखल घेतली जात नसल्याने ग्रामस्थांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.