मनमाडला अपघातांमध्ये वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2020 09:40 PM2020-05-20T21:40:45+5:302020-05-20T23:54:34+5:30

मनमाड : दिवसेंदिवस शहरातून जाणाऱ्या महामार्गावरील वाढत्या वाहतुकीमुळे नागरिकांना जीव मुठीत धरून चालावे लागते. त्यातच भरधाव वेगात येणाºया वाहनांमुळे अपघाताचे प्रमाण वाढले आहे.

Increase in accidents to Manmad | मनमाडला अपघातांमध्ये वाढ

मनमाडला अपघातांमध्ये वाढ

Next

मनमाड : (गिरीश जोशी ) दिवसेंदिवस शहरातून जाणाऱ्या महामार्गावरील वाढत्या वाहतुकीमुळे नागरिकांना जीव मुठीत धरून चालावे लागते. त्यातच भरधाव वेगात येणाºया वाहनांमुळे अपघाताचे प्रमाण वाढले आहे.
येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शेतमाल विक्रीसाठी ग्रामीण भागातून येणाºया वाहनांची गर्दी असते. बाजार समितीसमोरच अनेकदा वाहतुकीचा खोळंबा होत असल्याने वाहन चालवणे अडचणीचे होते. या रस्त्यावरील काही खड्ड्यांची डागडुजी करण्यात येत असली तरी पावसाळ्यात सततच्या रिमझिम पावसामुळे त्याचा फारसा उपयोग होत नसल्याचे दिसून येते. भरधाव वेगातील वाहने व रस्त्यांची दुरवस्था अपघातास निमंत्रण देत असतात.
मनमाड - चांदवड महामार्गावर निमोण चौफुली, नांदगाव रोडवर बुरकुलवाडी, येवला रोडला ओव्हर ब्रीजजवळ भरधाव वेगात धावणाºया वाहनांमुळे सातत्याने छोटे-मोठे अपघात होत असतात. भरधाव वेगात जाणारी वाहने या अपघातास कारणीभूत असल्याने नागरिकांकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे. या रस्त्यांजवळच शाळा-महाविद्यालये असून, विद्यार्थ्यांची मोठ्या प्रमाणात गर्दी असते.
मनोरम सदन, संत बार्णबा विद्यालय, सेंट झेविअर्स विद्यालय, गुड शेफर्ड शाळेकडे, मनमाड महाविद्यालय याकडे जाणाºया विद्यार्थ्यांना महामार्ग ओलांडताना जीव मुठीत धरून रस्ता पार करावा लागतो.
पुणे-इंदूर महामार्ग तसेच नांदगाव-नाशिक हा राज्यमार्ग मनमाड शहरातून पुढे जातात. शहरातील नागरिकांची वर्दळ तसेच बाहेरच्या वाहनांची वाहतूक यामुळे या महामार्गावर सतत गर्दी असते. कारखान्यांची मशिनरी वाहून नेणारे मोठे कंटेनर, मालवाहू ट्रक, पवन चक्कीची पाते वाहून नेणारे महाकाय
कंटेनर अशी अवजड वाहने शहरातून जात असताना रहदारीचा मोठा खोळंबा होत असतो.
या महामार्गावर काही ठिाकाणी गतिरोधक बसवण्यात आलेले असले तरी ते तुटले असल्याने फारसा उपयोग होत नाही. तर अनेक गतिरोधकांसमोर पांढरे पट्टे मारलेले नसल्याने अचानक समोर
आलेल्या गतिरोधकामुळे
भरधाव वेगातील वहानांनी करकचून ब्रेक लावल्यानंतर मागचे
वाहन त्याच्यावर धडकून अपघात होत आहे. दिवसेंदिवस वाढत्या रहदारमुळे शहरातून जाणारे महामार्ग हे अपघातास कारणीभूत ठरत
असल्याने शहरातील अवजड वाहतूक बायपास करून वळवण्यात यावी, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.
------------------------
गतिरोधकाची मागणी
मनमाड - नांदगाव रोडवर दुचाकीवरून जात असलेल्या संविधान बाळू पवार व गणेश दिलीप पवार यांची दुचाकी व मालट्रक यांच्यामध्ये अपघात झाला. या अपघातात एक जणाला आपला जीव गमवावा लागला आहे. या घटनेमुळे या भागातील नागरिकांनी महामार्गावर गतिरोधक बसविण्यात यावे, अशी लेखी मागणी केली आहे. निवेदनावर शिवसेनेचे शहर उपप्रमुख खालीद शेख, इम्रान शेख, किरण साळवे, रमेश पवार, असीफ बेग, हनीफ शेख, सय्यद मुश्ताक, शेख मंजूर, हिना शेख, नईम शेख आदी नागरिकांच्या स्वाक्षºया आहे.

Web Title: Increase in accidents to Manmad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक