कांदा अनुदान मागणी अर्जाच्या मुदतीत वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 7, 2019 02:51 PM2019-02-07T14:51:59+5:302019-02-07T14:52:16+5:30
सटाणा : राज्य शासनाने जाहीर केलेल्या कांदा अनुदान मागणीच्या मुदतीत पुन्हा वाढ केली आहे. १५ फेब्रुवारीपर्यंत मुदतीत वाढ केली असून तसे परिपत्र पणनचे संचालक दीपक तावरे यांनी प्रसिद्ध केले आहे.
सटाणा : राज्य शासनाने जाहीर केलेल्या कांदा अनुदान मागणीच्या मुदतीत पुन्हा वाढ केली आहे. १५ फेब्रुवारीपर्यंत मुदतीत वाढ केली असून तसे परिपत्र पणनचे संचालक दीपक तावरे यांनी प्रसिद्ध केले आहे.कांदा अनुदान मुदत वाढीचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन सटाणा बाजार समितीच्या सभापती मंगला सोनवणे यांनी केले आहे. राज्य शासनाने १ नोव्हेंबर ते ३१ डिसेंबर २०१८ या दरम्यान बाजार समिती आवारात कांदा विक्र ी करणाºया कांदा उत्पादन शेतकºयांना प्रती क्विंटल दोनशे रु पये अनुदान जाहीर केले होते.हे अनुदान प्राप्त करण्यासाठी शासनाने पाच जानेवारीपर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत दिली होती.मात्र बहुतांश शेतकरी मुदतीत अर्ज करू शकले नाहीत . परिणामी ते अनुदानापासून वंचित राहणार होते.अनुदान मागणी अर्ज सादर करण्याच्या मुदतीत वाढ करावी अशी मागणीही पुढे आल्याने त्याची दखल घेऊन पणनने मुदत वाढीचे परिपत्रक जारी केले आहे. २५ जानेवारी पर्यंत अनुदान मागणी अर्जाच्या मुदतीत वाढ केल्याने शेतकर्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.दरम्यान १ नोव्हेंबर ते ३१ डिसेंबर दरम्यान बाजार समिती आवारात विक्र ी केलेला कांदा त्याचे शासनाने जाहीर केलेले दोनशे रु पये अनुदान प्राप्त करून घेण्यासाठी कांदा विक्र ी पावतीची छायांकित प्रत ,कांदा पिकाची नोंद असलेला चालू सातबारा उतारा .राष्ट्रीयकृत बँकेच्या पासबुकच्या पिहल्या पानाची किंवा मायकर चेकची सुस्पष्ट छायांकित प्रत.आधार कार्डची छायांकित प्रत आदी १५ फेब्रुवारीपर्यंत अनुदान मागणी अर्ज सादर करावेत .त्यानंतर आलेल्या अर्जांचा विचार केला जाणार नाही असेही परिपत्रकात म्हटले आहे. सातबारा उतारा वडिलांच्या नावे व विक्र ीपट्टी मुलाच्या व अन्य कुटुंबियांच्या नावे आहे व साताबारा उताºयावर पिक पाहणीची नोंद आहे, अशा प्रकरणात वडील व मुलगा वा अन्य कुटुंबीय यांनी शंभर रु पयाच्या मुद्रांकावर सहमतीचे शपथपत्र अनुदान मागणी अर्जासोबत सादर केल्यानंतर उतारा ज्याच्या नावे असेल त्यांच्या बँक बचत खात्यामध्ये अनुदान जमा केले जाणार आहे.