सटाणा, चांदवड, नामपूरला खाटांची क्षमता वाढविणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2021 04:14 AM2021-04-16T04:14:07+5:302021-04-16T04:14:07+5:30

येथील सामान्य रुग्णालयातील आरोग्य सेवेचा आढावा घेतल्यानंतर भुसे पत्रकारांशी बोलत होते. सामान्य रुग्णालयात बुधवारी (दि.१४) रात्री ऑक्सिजन सिलेंडरचा ...

Increase bed capacity at Satana, Chandwad, Nampur | सटाणा, चांदवड, नामपूरला खाटांची क्षमता वाढविणार

सटाणा, चांदवड, नामपूरला खाटांची क्षमता वाढविणार

googlenewsNext

येथील सामान्य रुग्णालयातील आरोग्य सेवेचा आढावा घेतल्यानंतर भुसे पत्रकारांशी बोलत होते. सामान्य रुग्णालयात बुधवारी (दि.१४) रात्री ऑक्सिजन सिलेंडरचा तुटवडा निर्माण झाला होता. तसेच खासगी रुग्णालयांमध्येही अपुरे ऑक्सिजन सिलेंडर होते. या पार्श्वभूमीवर ऑक्सिजन सिलेंडर पुरवठा करणाऱ्या एजन्सींशी संपर्क साधून तातडीने सिलेंडर उपलब्ध करून देण्यात आले होते. गुरुवारी (दि.१५) भुसे यांनी सामान्य रुग्णालयाला भेट देऊन अतिदक्षता विभागातील दाखल रुग्णांशी संवाद साधला. तसेच अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. हितेश महाले यांच्याकडून आरोग्य व्यवस्थेचा आढावा घेतला. रुग्णांना वेळेवर औषधोपचार करण्याच्या सूचना भुसे यांनी केल्या. याआधी सहारा कोविड सेंटरची पाहणी केली. मनमाड येथील रेल्वे विभागाचे रुग्णालय ताब्यात घेतले जाणार आहे. तर सटाणा, चांदवड, नामपूर येथील रुग्णालयातील खाटांची क्षमता वाढविली जाणार असल्याचे भुसे यांनी सांगितले.

कोट....ऑक्सिजन सिलेंडरचा तुटवडा

मालेगाव येथील सामान्य रुग्णालयात सद्यस्थितीत १०० कोरोना बाधित रुग्णांवर उपचार केले जात आहे. रुग्णालयाकडे केवळ ७० ऑक्सिजन सिलेंडर व २ ड्युरा सिलेंडर उपलब्ध आहेत. सामान्य रुग्णालयाला दररोज ६ ड्युरा व २०० जम्बो सिलेंडरची आवश्यकता आहे; मात्र, पुरेसे ऑक्सिजन सिलेंडर उपलब्ध होत नसल्याने तुटवडा निर्माण होत असतो. रुग्णालय प्रशासनाची यामुळे धावपळ होत असते.

===Photopath===

150421\15nsk_12_15042021_13.jpg

===Caption===

मालेगाव येथे सामान्य रूग्णालयातील अतिदक्षता विभागातील कोरोना बाधित रूग्णांची पाहणी करुन अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. हितेश महाले यांच्याकडून आरोग्य व्यवस्थेचा आढावा घेताना कृषीमंत्री दादा भुसे.

Web Title: Increase bed capacity at Satana, Chandwad, Nampur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.