नाशकात दुचाकी चोरीच्या घटनेत वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 10, 2018 03:53 PM2018-08-10T15:53:13+5:302018-08-10T15:53:39+5:30
पंचवटी परिसरात गेल्या काही महिन्यांपासून दुचाकी चोरी होण्याच्या घटनेत वाढ झालेली आहे. दुचाकी चोरणाऱ्या टोळीतील सदस्य बनावट चावीच्या सहाय्याने हँडल लॉक तोडून दुचाकी लंपास करीत असल्याने वाहनधारक
नाशिक : परिसरातून दिवसा व रात्रीच्या सुमारास घराबाहेर अथवा रस्त्यालगत उभ्या केलेल्या मोटरसायकल चोरी होण्याच्या घटनेत गेल्या काही दिवसांपासून वाढ झाल्याने वाहनधारक त्रस्त झाले आहेत. चोरीच्या घटना वाढत असल्या तरी पोलिसांच्या हाती दुचाकी चोर लागत नसल्याने पोलिसांची डोकेदुखी वाढली आहे.
पंचवटी परिसरात गेल्या काही महिन्यांपासून दुचाकी चोरी होण्याच्या घटनेत वाढ झालेली आहे. दुचाकी चोरणाऱ्या टोळीतील सदस्य बनावट चावीच्या सहाय्याने हँडल लॉक तोडून दुचाकी लंपास करीत असल्याने वाहनधारक त्रस्त झाले आहेत. पंचवटी परिसरातून दुचाकी चोरी होत असल्या तरी पोलिसांना दुचाकी चोर हाती लागत नसल्याने तसेच कोणतेही धागेदोरे मिळत नसल्याने सध्या पंचवटी पोलिसांचाही ताण वाढला आहे.
काही महिन्यांपूर्वी पंचवटी पोलिसांनी दुचाकी करणा-या टोळीचा पदार्फाश करून दुचाकी मोटरसायकल जप्त केल्या होत्या मात्र आता गेल्या काही दिवसांपासून दुचाकी चोरट्यांनी पुन्हा पंचवटीत दुचाकी चोरी सत्र सुरू केल्याने पंचवटीत दुचाकी चोरट्यांची टोळी कार्यरत असल्याचे स्पष्ट झाले आहे. सध्या पंचवटीतून आठवड्याभरात किमान दोन ते तीन दुचाकी चोरी होत असल्याचे पोलिसांनी सांगितले.