तुरदाळ खपविण्यासाठी रेशनच्या कमिशनमध्ये वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2018 03:04 PM2018-05-08T15:04:16+5:302018-05-08T15:04:16+5:30

दोन वर्षापुर्वी वर्षी राज्यात तुरदाळीचे उत्पादन घटल्यामुळे बाजारातील मागणी व पुरवठ्याची घडी विस्कटली होती, परिणामी ऐन सणासुदीत ग्राहकांना खुल्या बाजारातून ९० ते १०० रूपये किलो दराने तुरदाळ खरेदी करावी लागली. त्यामुळे विरोधी पक्षांनी राज्य सरकारला जबाबदार धरले होते तर सरकारनेही या संकटावर मात करण्यासाठी तुरदाळ आयात केली होती, त्यातही घोटाळा झाल्याचा आरोप करण्यात आला होता.

Increase in commission's commission for transit | तुरदाळ खपविण्यासाठी रेशनच्या कमिशनमध्ये वाढ

तुरदाळ खपविण्यासाठी रेशनच्या कमिशनमध्ये वाढ

Next
ठळक मुद्देजुनमध्ये वाटप : शासनाकडे लाखो क्विंटल दाळ पडून

नाशिक : एकेकाळी शंभरी पार केलेल्या तुरदाळीचे वाढते महत्व लक्षात घेता शेतकऱ्यांनी गेल्या वर्षी घेतलेल्या अमाप पीकामुळे यंदा तुरदाळ सामान्यांच्या आवाक्यात असली तरी, हमीभावाने राज्य सरकारने खरेदी केलेली परंतु उठावा अभावी पडून असलेली तुरदाळ रेशनमधून विक्री करण्यासाठी दुकानदारांनाचा प्रोत्साहन देण्यासाठी कमिशनमध्ये वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे दुकानदारांनी रेशनमधून तुरदाळ विक्रीसाठी उत्सुकता दर्शविली असून, जून महिन्यांसाठी ५५० क्विंटल दाळीची मागणी नोंदविण्यात आली आहे.
दोन वर्षापुर्वी वर्षी राज्यात तुरदाळीचे उत्पादन घटल्यामुळे बाजारातील मागणी व पुरवठ्याची घडी विस्कटली होती, परिणामी ऐन सणासुदीत ग्राहकांना खुल्या बाजारातून ९० ते १०० रूपये किलो दराने तुरदाळ खरेदी करावी लागली. त्यामुळे विरोधी पक्षांनी राज्य सरकारला जबाबदार धरले होते तर सरकारनेही या संकटावर मात करण्यासाठी तुरदाळ आयात केली होती, त्यातही घोटाळा झाल्याचा आरोप करण्यात आला होता. तुरदाळीने कधी नव्हे इतका भाव खाल्याने सरकारने तुरदाळ लागवडीसाठी शेतकºयांना प्रोत्साहीत तर केलेच परंतु तुरीला मिळणारा भाव पाहून गेल्या वर्षी तुरदाळीच्या लागवड क्षेत्रातही वाढ झाली. परिणामी राज्यात बंपर पीक आले. त्यामुळे खुल्या बाजारातील शेतकºयांनी तुर कमी भावाने खरेदी करण्यास सुरूवात केल्याने शेतकºयांना दिलासा देण्यासाठी राज्य सरकारने हमीभावाने म्हणजेच ५० रूपये ५० पैसे दराने तूर खरेदी केंद्रे सुरू केली. राज्यात सुमारे १६ लाख क्विंटल तूर हंगामात खरेदी करण्यात आली. त्यामानाने त्याचा उठाव होवू शकला नाही. गेल्या चार महिन्यात जेमतेत ३ लाख क्विंटल तुरीची भरडाई होवून ती रेशनमधून विक्री करण्यात आली. डिसेंबर महिन्यात राज्य सरकारने रेशनमधुन ५५ रूपये किलो प्रमाणे प्रत्येकी एक किलो तुरदाळ देण्याचा निर्णय घेतला. परंतु खुल्या बाजारात पॉलीश केलेली उत्तम प्रतिची तुरदाळ ६० ते ६५ रूपयांपर्यंत मिळत असताना रेशनमधील तुरदाळ घेण्यास ग्राहकांनी नाके मुरडली. त्यामुळे नंतर तिची मागणीच नोंदविली गेली नाही. आता मात्र राज्य सरकारवर तुरीचे संकट कोसळले असून, लाखो क्विंटल तुरीचे करायचे काय असा प्रश्न निर्माण झाल्याने पुन्हा रेशनमधूनच ग्राहकांना ती सक्तीने विक्री करण्याचे ठरविण्यात आले आहे. त्यासाठी रेशन दुकानदारांना प्रोत्साहन देण्यात आले असून, त्यांच्या कमिशनमध्ये घसघशीत ३ रूपये वाढ करण्यात आली आहे जेणे करून त्यांनी अधिक तूर विक्री करावी.

Web Title: Increase in commission's commission for transit

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.