ढगाळ वातावरणामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2018 03:13 PM2018-03-16T15:13:38+5:302018-03-16T15:13:38+5:30
मानोरी : गेल्या पंधरा दिवसापासून वातावरणात होत असलेल्या सततच्या बदला मुळे शेतकरी आधीच पुरता त्रस्त झाला असून हवामानात खात्याने या दोन दिवसात पाऊस पडणार असल्याचे समजताच अजून शेतकºयांच्या चिंतेत भर पडली आहे.
मानोरी : गेल्या पंधरा दिवसापासून वातावरणात होत असलेल्या सततच्या बदला मुळे शेतकरी आधीच पुरता त्रस्त झाला असून हवामानात खात्याने या दोन दिवसात पाऊस पडणार असल्याचे समजताच अजून शेतकºयांच्या चिंतेत भर पडली आहे. मानोरी, मुखेड, सत्यगाव, देशमाने आदी परिसरात शेती मशागती मध्ये गहू सोंगणी,हरबरा काढणी,कांदे काढणे अशी कामे जोरात सुरू असल्याचे दृश्य दिसत आहे. कांदा, गहू पिकाला गेल्या दहा - बारा दिवसांपूर्वी एक ते दोन पाण्याची मोलाची गरज भासत होती.कांदा पीक पाण्याविना करपू लागली होती. त्यामुळे आवर्तनाच्या माध्यमातून पाणी मिळविण्यासाठी अनेक प्रकारची आंदोलने करत पाणी मिळवुन पिकांना मोठ्या प्रमाणात जीवनात दिले होते.परंतु मागील तीन ते चार दिवसांत परिस्थिती बदलून ढगाळ वातावरणामुळे रिमझिम पाऊस पडू लागल्याने बळीराजा हतबल झाला आहे. कांदे काढून विकावे की साठवावे हा प्रश्न निर्माण झाला आहे. आकाशातील काळ्या ढगाळ वातावरणामुळे पाऊस कधी बरसेल याचा अंदाज नसल्याने आधीच कमी दरात कांद्याला भाव मिळत असल्याने अशा वातावरणात तर अजून तोटा सहन करावा लागेल त्यामुळे कांदा पिकाला झालेला खर्च भरून निघण्याची सुद्धा नामुष्की शेतकºयांवर ओढवली आहे. महागडी कीटकनाशके, रासायनिक खते ,कांदे काढणीला सात हजार रु पये प्रति एकर भाव ,मजुरांना शेतात पोहचवण्यासाठी भाडोत्री गाडी ,आदी खर्च करून योग्य दर जर मिळाला नाही तर तेल ही गेले अन तूप ही गेले अशा शब्दात शेतकरी बोलत आहे. गव्हाच्या पिकाची परिस्थिती कांद्याच्या पिकासारखी झाली आहे.गहू सोंगणी ला मजूर मिळत नसल्याने अशा ढगाळ वातावरणामुळे हार्वेस्टिंग मशीन द्वारे गहू सोंगणी ला प्राधान्य दिले जात असून मागील दोन दिवसांत शेतकरी त्यांच्या मागावर आहे .एक हजार ते बाराशे रु पये प्रति एकर भाव देऊनही मशीन मिळत नसल्याने पावसाने जर धुमाकूळ घातला तर वाळलेले गव्हाचे पीक भुईसपाट होण्यास वेळ लागणार नाही.त्यामुळे तोंडाशी आलेला घास ओढला जातो की काय ? अशा शब्दात शेतकरी चर्चा जोर धरू लागली आहे.