नाशकात संसर्गजन्य तसेच साथीच्या रुग्णसंख्येत वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 24, 2017 11:26 AM2017-11-24T11:26:20+5:302017-11-24T11:26:27+5:30
डेंग्यू, लॅप्टो, गॅस्ट्रो, कॉलरा, टायफॉईड, मलेरिया यांसह सर्दी, ताप, खोकला आदि आजारांचा मोठा प्रार्दुभाव पहायला मिळत आहे.
नाशिक- थंडीत झालेली वाढ, दुपारी पडणारे कडक उन, मध्येच येणारा पाऊस, शहरात जागोजागी संसर्गजन्स आजारास कारणीभूत ठरणाºया डास, माशांची वाढती उत्पत्ती यामुळे डेंग्यू, लॅप्टो, गॅस्ट्रो, कॉलरा, टायफॉईड, मलेरिया यांसह सर्दी, ताप, खोकला आदि आजारांचा मोठा प्रार्दुभाव पहायला मिळत आहे.
जिल्हा रुग्णालयासह सर्व शासकीय रुग्णालयात तसेच खाजगी दवाखान्यांमध्ये रुग्णांची गर्दी दिसत आहे. वातावरणातील वेळोवेळी होणाºया बदलामुळे सर्दी, खोकला, ताप आदी आजारांनी डोके वर काढले आहे. ताप, सर्दी, खोकला आदी आजारांनी त्रस्त रु ग्ण उपचारासाठी खासगी आणि महापालिकेच्या रु ग्णालयांत धाव घेत आहेत.दरम्यान, महापालिका रुग्णालयांत येणाºया रु ग्णांना योग्य उपचार वेळीच मिळावेत, यासाठी काळजी घेतली जाते.
महापालिकेच्या आरोग्य विभागाने साफसफाई, फवारणी आदि आपल्या जबाबदाºया पार पाडत नागरिकांना दिलासा द्यावा अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. तर नागरिकांनीही डेंग्यूचा फैलाव होऊ नये म्हणून घरातील पाण्याचे साठे नियमीत स्वच्छ करणे, कचरा न करणे आदिंबाबत महापालिकेकडून जनजागृती करण्यात येत आहे. ताप, सर्दी ,खोकल्याचे रु ग्ण अधिक आहेत. उघडयावरील पदार्थ खाणे, शीतपेय यामुळे ताप, सर्दी, खोकला होऊ शकतो. त्यामुळे वाढत्या उकाडयात शीतपेय व उघडयावरील पदार्थ खाणे टाळावे, असे आवाहन डॉक्टरांकडून करण्यात येत आहे. मलेरिया आणि डेंग्यू पसरण्याचे कारण म्हणजे सर्वत्र मोठया प्रमाणावर होणारी डासांची निर्मिती. ही डासांची पैदास होण्यास महापालिका जशी जबाबदार आहे तसेच नागरिकही जबाबदार आहेत. यात महापालिका जास्त जबाबदार आहे. कारण या शहराच्या स्वच्छतेकडे व रोज शहरात निर्माण होणाºया कचºयाच्या विल्हेवाटीकडे महापालिकेचे अधिकारी आणि नगरसेवक यांनी दुर्लक्ष केले आहे. शहरात रोज अक्षरश: हजारो टन कचरा निर्माण होत आहे. शहरात मोठमोठी बांधकामे होत आहेत व गगनचुंबी इमारती उभ्या राहत आहेत. या इमारतींचे बांधकाम होत असताना तेथे असणारे वाळूचे ढीग, अन्य बांधकाम साहित्य व साठवण्यात येत असलेले पाणी यामुळे डासांची मोठया प्रमाणावर निर्मिती होते. त्यामुळे मलेरिया आणि डेंग्यूसारखे आजार फैलावत आहेत. पण डासांची निर्मिती करणाºया या केंद्रांकडे महापालिका अधिकारी लक्ष देत नाहीत ही वस्तूस्थिती आहे.