ॅदिंडारी तालुक्यात कोरोना रूग्णांमध्ये वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2020 07:06 PM2020-09-24T19:06:20+5:302020-09-24T19:08:18+5:30
वणी : दिंडोरी तालुक्यात कोरोनाबाधितांची संख्या आरोग्य विभागाची झोप उडविणारी आहे. ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ ही संकल्पना राबविली जातअसताना वाढणारी बाधितांच्या संख्या नियंत्रणात येण्यासाठी जागृतता गरजेची आहे. दिंडोरी तालुक्यात एकुण कोरोनाबाधितांची संख्या ६८९ असुन नगरपरिषद भागात ११५ तर जिल्हा परिषद कार्यक्षेत्रात ५७४ अशी बाधितांची विभागवारी आहे. ५२० बाधिताना उपचार व तपासणीनंतर डिस्चार्ज देण्यात आला असुन बाधितांच्या मृत्युची संख्या २१ आहे.
वणी : दिंडोरी तालुक्यात कोरोनाबाधितांची संख्या आरोग्य विभागाची झोप उडविणारी आहे. ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ ही संकल्पना राबविली जातअसताना वाढणारी बाधितांच्या संख्या नियंत्रणात येण्यासाठी जागृतता गरजेची आहे. दिंडोरी तालुक्यात एकुण कोरोनाबाधितांची संख्या ६८९ असुन नगरपरिषद भागात ११५ तर जिल्हा परिषद कार्यक्षेत्रात ५७४ अशी बाधितांची विभागवारी आहे. ५२० बाधिताना उपचार व तपासणीनंतर डिस्चार्ज देण्यात आला असुन बाधितांच्या मृत्युची संख्या २१ आहे.तालुक्यात कंन्टोनमेंट झोन २९५ आहे. सध्या तालुक्यातील ही स्थिती चिंताजनक आहे. तालुक्यातील मोठे शहर वजा गाव म्हणुन परीचीत वणीतही कोरोनाचा वाढता प्रभाव काळजी वाढवणारा आहे. वणीत सध्या कोवीड सेंटर कार्यान्वित झाल्याने परिसरातील बाधितांना दिलासा मिळाला आहे. बोपेगाव व कळवण तालुक्यातील अभोणा हे पर्याय आहेत. मात्रआरोग्य सुविधांवर मर्यादा पडल्या की जिल्हा रु ग्णालय हा एकमेव पर्याय सर्वसामान्याना उरतो त्या ठिकाणचाही अनुभव समाधानकारक नसल्याच्या तक्र ारीचा सुर उमटतो आहे. जिल्हाभरातील अत्यवस्थ बाधितांची संख्येच्या प्रमाणात होणारी वाढ त्याचाही ताण प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे आरोग्य विभागावर पडत आहे. विशेषत: वृद्ध व्यक्ती कोरोनाचा सामना करण्यास असमर्थ असल्याची अनामिक भीती तरु ण वयोगटातील बेफिकीर वृत्ती चाही प्रतिकुल परिणाम होतो आहे.दरम्यान कोरोनापुढे प्रशासनानेही हात टेकल्याची भावना नागरिकांमधे निर्माण झाल्याने हात धुवा , अंतर ठेवा अशा आरोग्यविषयी मार्गदर्शक सुचनांचे पालन कटाक्षाने करण्यासाठी ची मनोभुमिका नागरीकांना ठेवावी लागणार आहे.