शासकीय आधारभूत किंमत योजनेंतर्गत मका खरेदीचा वेग वाढवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2018 12:02 AM2018-01-23T00:02:33+5:302018-01-23T00:21:57+5:30

मका साठवणुकीसाठी गुदाम उपलब्ध झाल्याने ज्या शेतकºयांनी आॅनलाइन नोंदणी केली आहे, अशा शेतकºयांची मका खरेदी पूर्ववत सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला असला तरी धीम्या गतीने चालणाºया खरेदीप्रक्रियेचा वेग वाढवणे गरजेचे आहे. ४ डिसेंबर २०१७ पासून सुरू झालेल्या शासकीय मका खरेदी योजनेंतर्गत एमआयटी कॉलेज धानोरा येथील गुदाम व एसएनडी कॉलेज येवला येथील गुदामात १९ जानेवारी २०१८ अखेर ३४० शेतकºयांची १८५०० क्विंटलची मका खरेदी झालेली आहे.

Increase the cost of maize purchases under the government base price scheme | शासकीय आधारभूत किंमत योजनेंतर्गत मका खरेदीचा वेग वाढवा

शासकीय आधारभूत किंमत योजनेंतर्गत मका खरेदीचा वेग वाढवा

Next

येवला : मका साठवणुकीसाठी गुदाम उपलब्ध झाल्याने ज्या शेतकºयांनी आॅनलाइन नोंदणी केली आहे, अशा शेतकºयांची मका खरेदी पूर्ववत सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला असला तरी धीम्या गतीने चालणाºया खरेदीप्रक्रियेचा वेग वाढवणे गरजेचे आहे.  ४ डिसेंबर २०१७ पासून सुरू झालेल्या शासकीय मका खरेदी योजनेंतर्गत एमआयटी कॉलेज धानोरा येथील गुदाम व एसएनडी कॉलेज येवला येथील गुदामात १९ जानेवारी २०१८ अखेर ३४० शेतकºयांची १८५०० क्विंटलची मका खरेदी झालेली आहे.  या मक्याची रक्कम दोन कोटी ६३ लाख ६२ हजार रुपये एवढी आहे. यापैकी केवळ १०० शेतकºयांना ९० लाख रु पये मिळाले आहेत. उर्वरित २४० शेतकºयांची एक कोटी ७३ हजारांची रक्कम संबंधित मका उत्पादक शेतकºयांना अद्याप मिळणे बाकी आहे. खासगी बाजारभावापेक्षा शासकीय आधारभूत किमतीने खरेदी होणाºया केंद्रावर मका विक्र ीला किमान पाचशे रु पये प्रतिक्विंटल अधिक मिळत असल्याने शेतकºयांचा या केंद्रावर मका विक्र ी करण्यावर कल दिसून येत आहे. परंतु गेल्या महिन्यापासून शासनाकडून विक्री झालेल्या मालाचे पैसे न मिळाल्याने शेतकरी त्रस्त झाला आहे.  तालुक्यात यंदा मक्याचे विक्र मी उत्पादन वाढले असून, मक्याला स्थानिक व्यापाºयांकडून १००० ते ११५० रु पयांपर्यत सरासरी भाव मिळत आहे. या तुलनेत तालुका खरेदी-विक्री संघामार्फत होणाºया शासकीय आधारभूत खरेदीत प्रतिक्विंटल १४२५ रुपयांचा भाव मिळत असल्याने शेतकºयांनी शासकीय मका खरेदी केंद्राकडे धाव घेतली आहे.  सध्या ३१ डिसेंबरपर्यंत आॅनलाइन नोंदणी केलेल्यांची मका खरेदी करणे सुरू आहे; परंतु खरेदी धीम्या गतीने चालू आहे. शेतमालाचे पैसे तत्काळ देण्याचे आदेश करणाºया शासनाने अधिकृतपणे खरेदी केलेल्या मालाचे पैसे तालुक्यातील एकाही मका  उत्पादक शेतकºयास महिन्यापासून मिळाले नसल्याने शेतकरी संकटात सापडला आहे. 
शासनापेक्षा खासगी व्यापारी परवडले 
शासनापेक्षा खासगी व्यापारी परवडले अशी प्रतिक्रि या काही शेतकºयांमधून व्यक्त होत आहे. शासनाने शेतकºयांच्या अडचणी व हित लक्षात घेऊन मालाचे पैसे त्वरित वर्ग करावेत, अशी मागणी तालुक्यातील सर्व शेतकºयांकडून व्यक्त होत आहे. १७५९ आॅनलाइन नोंदणीधारक शेतकºयांपैकी ४३५ क्रमांकापर्यंतच्या शेतकºयांना माल विक्र ीसाठी आणण्याच्या सूचना केल्या असून, पैकी ३७५ शेतकºयांनी मका विक्र ी केला आहे. अद्याप १३८४ शेतकरी प्रतीक्षेत आहेत.  मका नोंदणीधारक शेतकºयांची संख्या मोठी आहे. गुदामाअभावी मका खरेदी केंद्र बंद होऊ नये म्हणून येवला तहसील कार्यालयाने एमआयटी कॉलेज धानोरा, कृउबा उपबाजार अंदरसूल व पाटोदा येथील व तालुक्यातील ग्रामीण भागातील गुदाम उपलब्ध करून देत मका खरेदी केंद्र विनाखंडित सुरू ठेवावी, अशी मागणी मका उत्पादक शेतकरीवर्गाकडून होत आहे.

Web Title: Increase the cost of maize purchases under the government base price scheme

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.