सर्दी-खोकल्याच्या रुग्णसंख्येत वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 3, 2017 12:15 AM2017-10-03T00:15:55+5:302017-10-03T00:16:03+5:30

नाशिक : बदलत्या वातावरणामुळे संसर्गजन्य आजारात वाढ झाली असून, यामुळे सर्दी आणि खोकल्याचे आजार अनेकांना जडले आहेत. लहानांपासून मोठ्यांपर्यत सर्दी, खोकल्याने असंख्य रुग्ण हैराण झाले आहेत. यामुळे खासगी आणि सरकारी दवाखान्यांमध्ये उपचारासाठी रुग्णांची गर्दी होत आहे.

Increase in cough and cough patients | सर्दी-खोकल्याच्या रुग्णसंख्येत वाढ

सर्दी-खोकल्याच्या रुग्णसंख्येत वाढ

googlenewsNext

नाशिक : बदलत्या वातावरणामुळे संसर्गजन्य आजारात वाढ झाली असून, यामुळे सर्दी आणि खोकल्याचे आजार अनेकांना जडले आहेत. लहानांपासून मोठ्यांपर्यत सर्दी, खोकल्याने असंख्य रुग्ण हैराण झाले आहेत. यामुळे खासगी आणि सरकारी दवाखान्यांमध्ये उपचारासाठी रुग्णांची गर्दी होत आहे.
एका ऋतूतून दुसºया ऋतूत जाताना निर्माण होणाºया नैसर्गिक बदलाचा परिणाम मानवी शरीरावर होत असतो. यातच यंदा झालेला पाऊस आणि सप्टेंबरच्या अखेरच्या चरणात जाणवणारी थंडी यामुळे मागील आठवड्यापासून रुग्णांची संख्या अधिक वाढल्याचे चित्र आहे. पाऊस मुबलक झाला असला तरी लहरी पावसामुळेही नैसर्गिक साखळीला काही प्रमाणात धक्का बसल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.
सर्दी, खोकला तसेच ताप असे आजार अनेकांना जडले आहेत.
यामुळे सरकारी रुग्णालयातील बाह्यरुण विभागात रुग्ण मोठ्या प्रमाणात उपचारासाठी दाखल होत आहेत तर महापालिकेच्या रुग्णालयामध्ये देखील उपचारासाठी येणाºयाचे प्रमाण ५० टक्क्याने वाढल्याचे सांगितले जाते. लहान मुलांमध्ये आणि बालकांमध्ये सर्दी तसेच कफचे प्रमाण अधिक आहे. यामुळे वाफ घेणाºयांची संख्या रुग्णालयात अधिक आहे. काहींना रोजच रुग्णालयात जाणेही खर्चिक वाटू लागल्याने नेब्युलाईन मशीन (वाफ मशीन) ही खेरदी केले जात आहे. वेळीच काळजी घ्यावी
सध्या संसर्गजन्य आजाराचे प्रमाण वाढले आहे. शक्यतो तेलकट, अंबट पदार्थ खाऊ नये, पाणी उकळून प्यावे, गर्दीच्या ठिकाणी जाण्याचे टाळावे त्यामुळे आजार बळावण्याची शक्यता असते. शिंकताना नाकाला रुमाल लावावा, इतरांनाही काळजी घेण्यास सांगावे, चार दिवसांपेक्षा अधिक दिवस खोकला असेल तर तत्काळ डॉक्टरांकडे जाऊन उपचार करून घ्यावे. ज्यांना धुळीची अलर्जी आहे त्यांनी काळजी घ्यावी. - डॉ. संजय देशमुख

Web Title: Increase in cough and cough patients

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.