अभोणा परिसरात खोकल्याच्या रुग्णात वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 04:28 IST2021-09-02T04:28:40+5:302021-09-02T04:28:40+5:30
गेल्या काही दिवसांपासून ऊन, पाऊस व ढगाळ वातावरणामुळे नागरिकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ लागला आहे. यामुळे ताप, सर्दी, खोकला, ...

अभोणा परिसरात खोकल्याच्या रुग्णात वाढ
गेल्या काही दिवसांपासून ऊन, पाऊस व ढगाळ वातावरणामुळे नागरिकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ लागला आहे. यामुळे ताप, सर्दी, खोकला, डोकेदुखी, शरीरात त्राणच नसणे आदी आजाराने त्रस्त झालेले रुग्ण दवाखान्यांमध्ये गर्दी करू लागले आहेत. मागील काही दिवसांपासून पाऊस थांबला असून उन्हाच्या झळा
नागरिकांना सोसाव्या लागत आहेत. वातावरणात झालेला बदल आणि प्रदूषणाचा नागरिकांच्या आरोग्यावर मोठ्या परिणाम होऊ लागला आहे. यामुळे आजाराची लक्षणे कळताच नागरिकांनी ताप, सर्दी, खोकला झाल्यास हा आजार सामान्य आहे असे न समजता तत्काळ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. दवाखान्यात जावे. घरगुती उपचारांना प्राध्यान्य देऊ नये. तसेच अशा आजारात लहान मुलांची सर्वाधिक काळजी घ्यावी.
कोट...
वातावरण बदलामुळे सर्दी, ताप, खोकला झालेल्या रुग्णांची संख्या वाढली आहे. रुग्णांनी सकस आहार घेणे गरजेचे आहे. रोग प्रतिकारकशक्ती वाढविण्यासाठी इ-जीवनसत्व घ्यावे. पाणी उकळून थंड करून प्यावे. आजार अंगावर न काढता आरोग्य केंद्रांमध्ये उपचारास जावे. तसेच मास्कचा वापर, सामाजिक अंतर ठेवून गर्दीची ठिकाणे टाळावीत.
- डाॅ. दीपक बहिरम, प्रभारी वैद्यकीय अधीक्षक, ग्रामीण रुग्णालय, अभोणा